नवी दिल्ली : भारताने १९३२ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण आतापर्यंत भारताचे केवळ १७ खेळाडू विस्डेनच्या वर्षातील पाच क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये स्थान मिळवू शकले. आश्चर्याची बाब म्हणजे त्यात सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश नाही.
विस्डेन या यादीत स्थान मिळविण्यासाठी केवळ इंग्लंडमधील कामगिरीला महत्त्व देत असते आणि त्यामुळे एकेकाळी सुनील गावस्कर यांनी त्यावर टीकाही केली होती. गावस्कर यांना १९८० मध्ये विस्डेनच्या पाच क्रिकेटपटूंच्या यादीत स्थान मिळाले होते, तर त्यांनी १९७१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांच्याच भूमीत ७७४ धावा फटकावत इतिहास रचला होता. दरम्यान, मोहिंदर अमरनाथला १९८४ मध्ये विश्वकप १९८३ च्या उपांत्य व अंतिम फेरीतील कामगिरीच्या आधारावर विस्डेनच्या या यादीत स्थान मिळाले होते. माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने म्हटले आहे की, त्याला यंदा विस्डेनच्या पाच खेळाडूंच्या यादीत रोहितचे नाव न दिसल्यामुळे आश्चर्य वाटले.
लक्ष्मण म्हणाला, ‘मला वाटते जे क्रिकेट बघतात त्यांना पाच खेळाडूंच्या यादीत रोहित नाव न दिसल्यामुळे आश्चर्य वाटले असेल.’
गांगुलीप्रमाणे आपल्या फलंदाजी व कर्णधारपदामुळे जगभर ओळख निर्माण करणाऱ्या धोनीला विस्डेनच्या यादीत स्थान मिळविता आले नाही. त्याने इंग्लंडमध्ये काही शानदार खेळी केल्या आहेत. विश्वनाथने आपली सर्वोच्च २२२ धावांची खेळी इंग्लंडविरुद्ध केली होती, पण ते स्थान चेन्नई होते. पण १९७९ मध्ये लॉर्ड््सवर खेळलेली त्याची ११३ धावांची खेळी कुणी विसरू शकत नाही. त्यामुळे भारताने सामना अनिर्णीत राखला होता.
सेहवागला कधीच विस्डेनच्या पाच क्रिकेटपटूंच्या यादीत स्थान मिळवता आले नाही. त्याला २००३ पासून सुरू करण्यात अलेल्या अव्वल क्रिकेटपटू (विस्डेन लीडिंग क्रिकेटपटू इन द वर्ल्ड) यासाठी दोनदा (२००८ व २००९) स्थान मिळाले आहे. हा मान सचिन तेंडुलकर (२०१०) व विराट कोहली (२०१६ व २०१९) यांनाही मिळाला आहे. भारताच्याच नव्हे तर जगातील अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना विस्डेनच्या पाच क्रिकेटपटूंच्या यादीत स्थान मिळालेले नाही. डिव्हिलियर्सला विस्डेनने गेल्या वर्षी दशकातील पाच क्रिकेटपटूंच्या यादीत स्थान दिले होते.
सी. के. नायडू (१९३३) विस्डेनच्या यादीत स्थान मिळविणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू होते. त्यापूर्वी रणजितसिंग (१८९७), त्यांचे पुतणे दिलीपसिंग (१९३०) आणि नबाव पतोडी सिनियर (१९३२) यांना हा मान मिळाला होता, पण हे तिन्ही खेळाडू त्यावेळी इंग्लंडतर्फे खेळत होते. विस्डेनने २००० ते २००३ पर्यंत या पुरस्कारासाठी जगभरातील कामगिरीचा आधार घेतला. दरम्यान, व्हीव्हीएस लक्ष्मणला आॅस्ट्रेलियाविरुद्ध कोलकातामध्ये खेळल्या गेलेल्या २८१ धावांच्या ऐतिहासिक खेळीसाठी विस्डेनच्या यादीत स्थान मिळाले होते.
दरम्यान, विस्डेनने त्यानंतर पुन्हा आपली जुनी परंपरा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आणि जगभरातील क्रिकेटपटूंसाठी विस्डेन लीडिंंग क्रिकेटर इन द वर्ल्डची सुरुवात केली.
(वृत्तसंस्था)
च्रोहितने गेल्या दोन वर्षात वन-डे क्रिकेटमध्ये इंग्लंडमध्ये खोºयाने धावा ठोकल्या आहेत. त्याने विश्वकप २०१९ मध्ये पाच शतकांच्या सहाय्याने ६४८ धावा केल्या. पण विस्डेनने त्याची ही कामगिरी वर्षातील पाच क्रिकेटपटूंमध्ये समावेश करण्यालायक मानली नाही.
च्गांगुलीने तर आपल्या कारकिर्दीची सुरुवात इंग्लंडमध्येच केली होती आणि पहिल्या दोन कसोटी सामन्यात शतके झळकावली होती. त्याने इंग्लंडमध्ये ९ कसोटी सामन्यात ६५.३५ च्या सरासरीने ९१५ धावा केल्या आहेत. वन-डेमध्ये त्याची सर्वोच्च खेळी १८३ धावा (विरुद्ध श्रीलंका विश्वकप १९९९) इंग्लंडमध्येच झाली आहे. पण विस्डेनने कधीच भारतीय कर्णधाराचा वर्षातील पाच क्रिकेटमध्ये समावेश करणे योग्य मानले नाही.
या भारतीय खेळाडूंना मिळाले नाही स्थान
सौरव गांगुली, धोनी व रोहित यांच्याव्यतिरिक्त गुंडप्पा विश्वनाथ, वीरेंद्र सेहवाग, फिरकीपटूंच्या चौकडीतील बिशनसिंग बेदी, इरापल्ली प्रसन्ना आणि एस. व्यंकटराघवन, हरभजन सिंग, रविचंद्रन अश्विन, जवागल श्रीनाथ, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा आदी प्रमुख भारतीय खेळाडूंना या यादीत स्थान मिळाले नाही.
या विदेशी खेळाडूंचीही अॅलर्जी
इंझमाम-उल-हक, एबी डिव्हिलियर्स, डेव्हिड वॉर्नर, रॉस टेलर, ख्रिस गेल, स्टीफन फ्लेमिंग, रंगना हेराथ, नॅथन लियोन, डॅनियल व्हेट्टोरी, चामिंडा वास, मिशेल जॉन्सन, मोर्ने मोर्कल यांनाही यात स्थान मिळालेले नाही.
विस्डेनच्या यादीत समावेश असलेले भारतीय क्रिकेटपटू
सी. के. नायडू (१९३३), विजय मर्चंट (१९३७), विनू मंकड (१९४७), मन्सूर अली खां पतोडी (१९६८), भागवत चंद्रशेखर (१९७२), सुनील गावस्कर (१९८०), कपिल देव (१९८३), मोहिंदर अमरनाथ (१९८४), दिलीप वेंगसरकर (१९८७), मोहम्मद अझहरुद्दीन (१९९१), अनिल कुंबळे (१९९६), सचिन तेंडुलकर (१९९७), राहुल द्रविड (२०००), व्हीव्हीएस लक्ष्मण (२००२), झहीर खान (२००८), शिखर धवन (२०१४) आणि विराट कोहली (२०१९).
Web Title: The Giants didn't get a place on the Wisden list
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.