Glenn Maxwell, Australia won by 2 wickets : मंगळवारचा दिवस दर्दी क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीचा ठरला... इंग्लंड-न्यूझीलंड कसोटीच्या पाचव्या दिवशी जॉनी बेअरस्टो व बेन स्टोक्सची आतषबाजी पाहायला मिळाली. त्यानंतर भारतीय संघाने करो वा मरो सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून मालिकेतील आव्हान कायम राखले. कसोटी व ट्वेंटी-20तील थरारानंतर ऑस्ट्रेलिया -श्रीलंका ( Australia vs Sri Lanka) यांच्यातल्या वन डे सामन्याने क्रिकेटप्रेमींचे मन जिंकले. कुशल मेंडिस व वनिंदू हसरंगा यांच्या तुफान फटकेबाजीनंतर ऑसींकडून ग्लेन मॅक्सवेलची बॅट आडवी तिडवी चालली... त्याच्या वादळी खेळीच्या जोरावर ऑसींनी पहिल्या वन डेत 2 विकेट्स राखून विजय मिळवला.
१ चेंडूच्या फरकाने १२० वर्षांपूर्वीचा विक्रम वाचला; Jonny Bairstow कसोटीत ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 50 षटकांत 7 बाद 300 धावा केल्या. दानुष्का गुणथिलका व पथूम निसांका यांनी 115 धावांची भागीदारी करताना संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. दानुष्का 55, तर पथूम 56 धावांवर माघारी परतल्यानंतर कुशल मेंडिसने मोर्चा सांभाळला. पण, त्याला अन्य फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळाली नाही. धनंजया डी सिल्वा ( 7), कर्णधार दासून शनाका ( 6) व चमिरा करुणारत्ने ( 7 ) अपयशी ठरले. चरिथ असलंकाने ( 37) थोडा हारभार लावला. वनिंदू हसरंगा सप्राईज पॅकेज ठरला. त्याने 19 चेंडूंत 37 धावा चोपल्या. कुशलने 8 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 86 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर भोपळ्यावर माघारी परतला. कर्णधार आरोन फिंच ( 44 ) व स्टीव्ह स्मिथ ( 53 ) यांनी ऑसींचा डाव सावरला. पण, मार्नस लाबुशेन ( 24) , मार्कस स्टॉयनिस ( 44 ) व अॅलेक्स केरी ( 21) यांच्या बाद होण्याचे ऑसी पुन्हा अडचणीत सापडले. त्यात पॅट कमिन्स ( 0) व अॅश्टन अॅगर ( 3) हेही झटपट माघारी परतले होते. अशात ग्लेन मॅक्सवेलने एकट्याने झुंज दिली. पावसाच्या व्यत्ययामुळे ऑसींसमोर 44 षटकांत 282 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. मॅक्सवेलने त्याच वेगाने धावा केल्या. त्याने 51 चेंडूंत नाबाद 80 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 6 चौकार व 6 षटकार अशा 60 धावा या अवघ्या 12 चेंडूंत कुटल्या. ऑसींनी 42.3 षटकांत 8 बाद 282 धावा करून विजय पक्का केला.