Join us  

सूर्यकुमार यादव परवडणारा नाही, त्याच्यासाठी संघातील सर्वांना...! असं का म्हणतोय ग्लेन मॅक्सवेल?

Suryakumar Yadav : भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याचा फॉर्म हा गगनचुंबी झेप घेतोय.... मार्च २०२१मध्ये ट्वेंटी-२० संघात संधी मिळालेल्या सूर्याने मागे वळून पाहिलेच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 11:53 AM

Open in App

Suryakumar Yadav : भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याचा फॉर्म हा गगनचुंबी झेप घेतोय.... मार्च २०२१मध्ये ट्वेंटी-२० संघात संधी मिळालेल्या सूर्याने मागे वळून पाहिलेच नाही आणि एकामागून एक असे अनेक विक्रम तो करत गेलाय... २०२२मध्ये तर त्याने आपल्या फलंदाजांनी Mr 360 एबी डिव्हिलियर्सलाही प्रेमात पाडले आणि जगाला नवा Mr. 360 मिळालाय अशी चर्चा सुरू झाली. २०२२ या कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त सर्वाधिक ११५१ धावा त्याने केल्या. कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त १०००+ धावा करणारा तो पहिला भारतीय आणि जगातला दुसरा फलंदाज ठरला आहे. आता त्याच्या नावाची जगभरात हवा आहे आणि ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) याने मोठं विधान केलं आहे.

IND vs BAN : कसोटी वर्ल्ड कपही जाणार? बांगलादेश दौऱ्यापूर्वी भारताच्या अष्टपैलू खेळाडूची माघार; Suryakumar Yadav पदार्पण करणार

भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी सूर्याला खूप संघर्ष करावा लागला. आयपीएल २०१८मध्ये त्याला मुंबई इंडियन्सने करारबद्ध केले आणि पहिल्याच पर्वात MI कडून त्याने सर्वाधिक ५१२ धावांचा विक्रम केला. त्यानंतर २०१९मध्ये ४२४ धावा करून तो दुसऱ्या स्थानावर राहिला. तरीही त्याला भारतीय संघात पदार्णाची संधी २०२१मध्ये मिळाली आणि त्याने त्यानंतर मागे वळूनच पाहिले नाही. आता तर त्याला करारबद्ध करण्यासाठी मोठमोठे ब्रांड त्याच्या मागे लागले आहेत.

कॅलेंडर वर्षात सर्वाधिक ७ मॅन ऑफ दी मॅच पटकावण्याच्या झिम्बाब्वेच्या सिकंदर रझा याच्या विक्रमाशी सूर्यकुमारने बरोबरी केली. विराट कोहलीने २०१६ मध्ये सहा मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार जिंकले होते. कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त २ शतक झळकावणारा सूर्या चौथा फलंदाज ठरला आहे. कॉलिन मुन्रो ( न्यूझीलंड, २०१७), रोहित शर्मा ( भारत, २०१८) व रिली रोसोवू ( दक्षिण आफ्रिका, २०२२) यांनी हा पराक्रम केला आहे. आता त्याला BBL म्हणजेच बिग बॅश लीगमध्ये खेळायला घ्यावे का असा प्रश्न ग्लेन मॅक्सवेलला विचारण्यात आला.

त्यावर मॅक्सवेल म्हणाला, बिग बॅश लीगमध्ये कोणत्याच संघाता सूर्यकुमार यादवला आपल्या ताफ्यात घेणे परवडणारे नाही. त्याच्यासाठी संघातील बऱ्याच जणांना बाहेर काढावा लागेल. तेव्हा कुठे बजेट जुळून येईल. ( हसत हसत).  सूर्यकुमार यादव जगातील इतर सर्वांपेक्षा खूप चांगला फलंदाज आहे. तो देवासारखा  आहे. जगात कोणीही सूर्यकुमारच्या जवळ नाही. सूर्यकुमार जे करत आहेत अवास्तव आहे.

मॅक्सवेल भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता कमी आहे. इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेआधी मॅक्सवेल एका मित्राच्या बर्थ डे पार्टीत पडला अन् त्याच्याला पायाला दुखापत झाली. त्यामुळे तो आता ३ महिने क्रिकेटपासून दूरच राहणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी फेब्रुवारीत भारत दौऱ्यावर येणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :सूर्यकुमार अशोक यादवग्लेन मॅक्सवेलबिग बॅश लीग
Open in App