IPL 2023 : खेळाडूंच्या जागतिक संघटनेने आयपीएलच्या स्टार खेळाडूंच्या पगारात वाढ करण्याची विनंती बीसीसीआयकडे केली आहे. बेन स्टोक्स. विराट कोहली आणि अनेक खेळाडूंसोबत फ्रँचायझींनी १६-१७ कोटींचा करार केला आहे, परंतु , ही रक्कम आयपीएलमधून संघांनी मिळवलेल्या रकमेचा केवळ एक अंश आहे. आयपीएलच्या एकूण महसुलातील केवळ १७ टक्के रक्कम ही खेळाडूंच्या पगारावर खर्च केली जाते, तर प्रीमिअर लीगमध्ये ७१ टक्के रक्कम ही खेळाडूंना पगाराच्या स्वरूपात दिली जाते.
FICA या खेळाडूंच्या जागतिक संघटनेने आयपीएल आणि डब्लूपीएल मधून मिळणाऱ्या एकूण महसूलातील जास्त वाटा खेळाडूंसाठी वापरण्यात यावा असे सांगिते आहे. टेलेग्राफने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल फ्रँचायझी एका पर्वात जेवढे कमावतात त्यातले फक्त १८ टक्के हे खेळाडूंना पगाराच्या स्वरूपात खर्च केले जातात. प्रीमिअर लीग आणि NFLच्या तुलनेत ही आकडेवारी तुटपूंजी आहे. “खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळणे आवडते, यात काही शंका नाही. जर तुम्ही या लीगमधून मिळणाऱ्या एकूण कमाईच्या टक्केवारीच्या तुलनेत तुलनात्मकदृष्ट्या पाहिले तर, एकूणच खेळाडूंना मिळणारा पगार हा अन्य लीगपेक्षा खूप कमी आहे. आयपीएल आणि डब्ल्यूपीएल यशस्वी होताना पाहण्यासाठी, खेळाडूंना योग्य आणि प्रमाणात मोबदला मिळावा यासाठी आम्ही उत्सुक आहोत, ”टॉम मोफॅट यांनी टेलिग्राफ स्पोर्टला सांगितले.
सर्व १० फ्रँचायझींना IPL 2023 साठी BCCI कडून तब्बल ४९० कोटी रुपये मिळाले आहेत. भारतीय क्रिकेट बोर्ड स्वतः ५०% कमाईतील रक्कम ठेवते. फ्रँचायझी तिकीट विक्री, प्रायोजकत्व आणि मर्चंडाईज विक्रीतून जवळपास ५० कोटी कमावतात. एकंदरीत, फ्रँचायझी ५०० कोटींहून अधिक कमाई करतात, त्यापैकी ९५ कोटी खेळाडूंच्या पगारासाठी बाजूला ठेवले जातात. बेन स्टोक्स, सॅम करन, रवींद्र जडेजा, कॅमेरून ग्रीन, विराट कोहली आणि इतरांची कमाई १५ कोटींहून अधिक आहे. तथापि, संघातील अनेकांना केवळ २० लाख रुपये मिळाल्याने मोठी घट झाली आहे. सर्व पगार इंडेक्स-लिंक्ड आहेत, याचा अर्थ खेळाडूंनी गमावलेल्या प्रत्येक गेमसाठी त्यांच्या फी पैकी २० टक्के रक्कम गमावली जाते.
तथापि, FICA अधिक महसूल-वाटप मॉडेलसाठी जोर देत असताना, सध्याच्या लँडस्केपमध्ये तसे होण्याची शक्यता नाही. FICA इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि वेस्टइंडीजमधील खेळाडूंच्या संघटनांशी संलग्न आहे. भारतात खेळाडूंचे संघटन नाही आणि आयपीएलच्या कमाईत जास्त वाटा उचलण्यासाठी खेळाडूंसाठी कोणतीही संयुक्त आघाडी नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"