Video : न्यूझीलंडच्या फलंदाजानं आणलं इंग्लंडमध्ये वादळ; रिषभ पंतच्या 'रिव्हर्स स्वीप'पेक्षा मारला भारी फटका!

ग्लूस्टरशायर संघानं ६ षटकांत ३५ धावांत ४ मोठ्या विकेट्स गमावल्या, पण त्यानंतर आलेल्या फिलिप्सनं ससेक्सच्या गोलंदाजांची धुलाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 11:04 AM2021-06-26T11:04:07+5:302021-06-26T11:04:51+5:30

whatsapp join usJoin us
Gloucestershire vs Sussex : Glenn Phillips smashed 94* runs from just 58 balls including 7 fours & 5 sixes, Video | Video : न्यूझीलंडच्या फलंदाजानं आणलं इंग्लंडमध्ये वादळ; रिषभ पंतच्या 'रिव्हर्स स्वीप'पेक्षा मारला भारी फटका!

Video : न्यूझीलंडच्या फलंदाजानं आणलं इंग्लंडमध्ये वादळ; रिषभ पंतच्या 'रिव्हर्स स्वीप'पेक्षा मारला भारी फटका!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

न्यूझीलंडचा फलंदाज ग्लेन फिलिप्स ( Glenn Phillips) यानं इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या व्हिटालीटी ब्लास्ट ( Vitality Blast) स्पर्धेत वादळ आणलं आहे. ग्लूस्टरशायर आणि ससेक्स ( Gloucestershire vs Sussex ) यांच्यातल्या सामन्यात त्यानं चौकार-षटकारांची आतषबाजी करून संघाला संकटातून बाहेर आणले अन् विजय मिळवून दिला. ग्लूस्टरशायर संघानं ६ षटकांत ३५ धावांत ४ मोठ्या विकेट्स गमावल्या, पण त्यानंतर आलेल्या फिलिप्सनं ससेक्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. फिलिप्सनं नाबाद ९४ धावा कुटताना संघाला निर्धारीत २० षटकांत ५ बाद १६२ धावांचा पल्ला गाठून दिला. प्रत्युत्तरात ससेक्सचा संपूर्ण संघ १३५ धावांत माघारी परतला. या सामन्यात फिलिप्सनं मारलेला रिव्हर्स स्वीप चर्चेचा विषय ठरला आहे.

ग्लूस्टरशायरचा गोलंदाज बेनी हॉवेल यानं १५ धावांत ४, तर रेयान हिग्गिंसनं १८ धावांत ३ विकेट्स घेतल्या. फिलिप्सनं सलग दुसऱ्या दिवशी नाबाद ९४ धावांची खेळी केली. त्यानं याआधी ग्लेमोर्गन संघाविरुद्ध ४१ चेंडूंत नाबाद ९४ धावा केल्या होत्या. त्याला सलग दुसऱ्या सामन्यात मॅन ऑफ दी मॅच हा पुरस्कार मिळाला. 
ससेक्सविरुद्ध फिलिप्स ग्लूस्टरशायर संघासाठी संकटमोचक म्हणून आला. त्यानं १२ चेंडूंत फक्त चौकार व षटकारांनी ५८ धावा कुटल्या. फिलिप्सनं ५८ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ९४ धावा केल्या. फिलिप्स व टेलर ( ४० धावा) यांनी संघाचा डाव सावरला.  

ग्लेन फिलिप्सची ट्वेंटी-२० ब्लास्टमधील कामगिरी 
४४ ( ३२ चेंडू), ४२ ( २७), ३८ ( २३), ७(३), ४१(२५), ९४*( ४१) व ९४* ( ५८)  
सर्वाधिक धावा - ३६०
सर्वाधिक षटकार - २८

Web Title: Gloucestershire vs Sussex : Glenn Phillips smashed 94* runs from just 58 balls including 7 fours & 5 sixes, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.