unique advice to Virat Kohli - इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( RCB) विराट कोहलीला येत असलेले अपयश ही फ्रँचायझीची मोठी दोखेदुखी ठरलीय. RCBचा माजी कर्णधार आयपीएल २०२२मध्ये तीन वेळा गोल्डन डकवर बाद झाला आणि त्याने केवळ एकच अर्धशतक झळकावले आहे.
आज RCB समोर पंजाब किंग्सचे आव्हान आहे आणि प्ले ऑफच्या दृष्टीने ही लढीत दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. या लढतीपूर्वी विराटचा फॉर्म परत यावा यासाठी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन ( former England skipper Michael Vaughan ) याने अजब सल्ला दिला आहे. त्याने विराटला १० वर्ष मागे जायला सांगितलंय आणि लग्नाआधी व मुलबाळ होण्याआधी जसा होतास तसा बन असा सल्ला दिला आहे.
''फॅफ ड्यू प्लेसिसने त्याच्यासोबत चर्चा केली असेल, अशी मला आशा आहे. त्याने त्याला सांगितलं असेल की, १० वर्ष मागे जा, जेव्हा तू कोण नव्हतास. तुझं लग्न झालं नव्हतं आणि तुला मुलबाळही नव्हतं. मैदानावर उतर आणि खेळाचा आनंद लुट... तुझं वय कितीय हे विसर, तू काय केलंस हे विसर,''असे वॉन Cricbuzz शी बोलताना म्हणाला. विराटने ३५+ धावा केल्या की तो मोठी खेळी करेल असा विश्वास व्यक्त करताना वॉन म्हणाला, ''त्याने ३५ धावा केल्या, तर तो नक्कीच मोठी खेळी करेल. ०-१० हा धावसंख्येत तो अडखळतोय. यातून तो बाहेर पडला की तो प्रतिस्पर्धींसाठी घातक ठरू शकतो.''
विराटने १२ सामन्यांत १९.६४च्या सरासीने २१६ धावा केल्या आहेत. अव्वल चार संघांच्या शर्यतीत RCBही आघाडीवर आहे. त्यांच्या खात्यात १४ गुण आहेत आणि उर्वरित दोन सामन्यांतील विजय त्यांचे स्थान पक्के करेल. त्यांना एक विजयही पुरेसा आहे, पण पुन्हा गणित इतरांच्या कामगिरीवर अवलंबून राहते. इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये प्ले ऑफचे पहिले तिकीट गुजरात टायटन्सने पटकावले... त्यात काल मुंबई इंडियन्सने विजय मिळवून चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपुष्टात आणले. ५ वेळचे विजेते मुंबई आणि ४ वेळचे विजेते चेन्नई हे आयपीएल २०२२मधून बाद झाले आहेत. आता प्ले ऑफच्या उर्वरित ३ जागांसाठी ७ संघांमध्ये चुरस आहे.
Web Title: Go back 10 years, you are not married: former England skipper Michael Vaughan offers unique advice to Virat Kohli amid poor form
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.