Join us  

विश्वकपसाठी ‘बॅक-अप’ तयार करण्याचे लक्ष्य : अरुण

भारतासाठी चांगल्या वेगवान गोलंदाजांचा पूल तयार करण्यात गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्या योगदानाकडे डोळेझाक करता येणार नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 2:54 AM

Open in App

नवी दिल्ली : भारतासाठी चांगल्या वेगवान गोलंदाजांचा पूल तयार करण्यात गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्या योगदानाकडे डोळेझाक करता येणार नाही. इंग्लंडमध्ये होणाºया २०१९ विश्वकप स्पर्धेसाठी प्रतिभावान वेगवान गोलंदाजाचा ‘बॅक-अप’ तयार करणे हे पुढील लक्ष्य निर्धारित केले आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा विचार करता संघव्यवस्थापनाला भुवनेश्वर कुमार व जसप्रीत बुमराह यांच्या रूपाने मुख्य वेगवान गोलंदाज गवसले आहेत.अरुण यांनी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व कर्णधार विराट कोहलीच्या साथीने किमान तीन आणखी ‘बॅक-अप’ पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे.अरुण म्हणाले, ‘श्रीलंकेतील टी-२० तिरंगी मालिकेत आम्हाला आपल्या वेगवान गोलंदाजांच्या ‘बेंच स्ट्रेंथ’ची चाचणी घेण्याची चांगली संधी राहील. आमच्याकडे भुवी व बुमराह यांच्या रूपाने दोन जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत, पण आम्ही एक चांगला पूल तयार केला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर व जयदेव उनाडकट श्रीलंकेत जाणार असून संधीचा लाभ घेण्यासाठी प्रयत्नशील असतील. आमच्याकडे अद्याप प्रदीर्घ सत्र आहे. आम्हाला दुखापत किंवा फिटनेसबाबतच्या मुद्याला तोंड देण्यास सज्ज राहावे लागेल. शार्दुल ठाकूर चांगली कामगिरी करीत आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेत चांगला मारा केला. शमी आणि उमेशही शर्यतीत आहेत. (वृत्तसंस्था)कारण देवधर ट्रॉफी (अनुक्रमे भारत ‘अ’ आणि ‘ब’) संघांतर्फे ते खेळणार आहेत.’