रांची : वन-डेमध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध शानदार विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ आज शनिवारपासून प्रारंभ होणा-या टी-२० मालिकेतही विजयाची लय कामय राखण्यास उत्सुक आहे.विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने यंदाच्या मोसमात कामगिरीत सातत्य राखताना आॅस्ट्रेलियाचा वन-डे मालिकेत ४-१ ने पराभव करीत क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. टी-२० मानांकनामध्ये ५व्या स्थानावर असलेला भारतीय संघ शनिवारी जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये प्रारंभ होत असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप देत मानांकन सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे. दुसºया बाजूचा विचार करता आॅस्ट्रेलियन संघाचे लक्ष्य भारताविरुद्ध २०१६ मध्ये टी-२० विश्वकप स्पर्धेत पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा हिशेब चुकता करण्याचे आहे.सामन्यात पावासाचा व्यत्यय निर्माण होण्याची शक्यताराची : भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान शनिवारी खेळल्या जाणाºया पहिल्या टी-२० लढतीत पावसाचा व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण शुक्रवारी दुपारी रांचीमध्ये जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याने पुढील २४ तासांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे....आणि विराटने डान्स केलारांची : सलग दुसºया दिवशी झालेल्या पावसामुळे भारतीय क्रिकेट संघ सराव करू शकला नाही; परंतु याचा संघाच्या मनोबलावर विशेष परिणाम झाला नाही. उलट पावसाचा आनंद खेळाडूंनी लुटला. त्यामुळे त्याला पुन्हा ड्रेसिंग रूममध्ये परतावे लागले. दरम्यान, पॅव्हेलियनच्या बालकनीत कोहलीसह वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह उभे होते. एकमेकांत कोणत्यातरी गोष्टीवरून विनोद सुरू होता आणि अचानकच कोहलीने डान्स सुरू केला. कशामुळे त्याने डान्स केला हे माहीत झाले नसले तरी काही तरी खेळाडूंत मात्र उत्साह पाहायला मिळाला.प्रतिस्पर्धी संघभारत :- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के.एल. राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, एम.एस. धोनी, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा, अक्षर पटेल.आॅस्ट्रेलिया : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, जेसन बेहरेनडोर्फ, डॅन ख्रिस्टियन, नॅथन कुल्टर नाईल, अॅरोन फिंच, ट्रेव्हिस हेड, मोईसेस हेन्रिक्स, ग्लेन मॅक्सवेल, टीम पेन, केन रिचर्डसन, अॅडम जम्पा.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- विराट सेनेचे विजयाचे लक्ष्य, सामन्यात पावासाचा व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता
विराट सेनेचे विजयाचे लक्ष्य, सामन्यात पावासाचा व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता
वन-डेमध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध शानदार विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ आज शनिवारपासून प्रारंभ होणा-या टी-२० मालिकेतही विजयाची लय कामय राखण्यास उत्सुक आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 3:46 AM