बंगळुरू : वन डे मालिका हातून निसटली तरी अखेरचे दोन सामने जिंकून अॅशेस मालिकेआधी फॉर्ममध्ये परतणे हे संघाचे लक्ष्य असल्याची माहिती डेव्हिड वॉर्नरने बुधवारी पत्रकारांना दिली.विश्व चॅम्पियन असलेल्या आॅस्ट्रेलियाला देशाबाहेर सलग पराभवाचा सामना करावा लागत आहे. अॅशेस मालिकेला २३ नोव्हेंबरपासून ब्रिस्बेन येथे सुरुवात होईल. ही मालिका आॅसीसाठी प्रतिष्ठेची आहे. वॉर्नर म्हणाला, ‘मालिका गमावणे निराशादायी ठरले. पण देशासाठी खेळताना अखेरचे दोन सामने जिंकावेच लागतील. अॅशेस मालिकेआधी हे विजय उत्साहवर्धक ठरणार आहेत.’ सध्याच्या मालिकेत भारतीय परिस्थितीशी ताळमेळ साधण्यात आम्ही कमी पडलो, अशी कबुली वॉर्नरने दिली.वॉर्नर शंभरावा सामना खेळणार आहे. याविषयी विचारताच तो म्हणाला, ‘माझ्या आणि कुटुंबीयांसाठी ही गौरवास्पद बाब आहे. एमसीजीवर ९० हजार प्रेक्षकांपुढे टी-२० तसेच दोन वन डेत देशाचे प्रतिनिधित्व केल्यापासून इतक्या लवकर सामन्यांचे शतक गाठेन, असे ध्यानीमनी नव्हते. करियरमध्ये सुरुवातीच्या काळात खूप गोष्टी आत्मसात केल्याने हे शक्य होऊ शकले.’ (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- आॅस्ट्रेलियापुढे विजयीमार्गावर येण्याचे लक्ष्य; अॅशेसपूर्वी सूर मिळवायचा आहे - डेव्हीड वॉर्नर
आॅस्ट्रेलियापुढे विजयीमार्गावर येण्याचे लक्ष्य; अॅशेसपूर्वी सूर मिळवायचा आहे - डेव्हीड वॉर्नर
वन डे मालिका हातून निसटली तरी अखेरचे दोन सामने जिंकून अॅशेस मालिकेआधी फॉर्ममध्ये परतणे हे संघाचे लक्ष्य असल्याची माहिती डेव्हिड वॉर्नरने बुधवारी पत्रकारांना दिली.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 1:50 AM