Join us  

युवा खेळाडू ते 'विराट' फलंदाज! कोहलीच्या विश्वविक्रमावर 'क्रिकेटचा देव' प्रसन्न, सांगितली पहिली भेट

IND vs NZ, 1st Semi-Final : वन डे विश्वचषकातील पहिला उपांत्य फेरीचा सामना आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 6:05 PM

Open in App

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून विराट कोहलीने ऐतिहासिक कामगिरी केली. मागील काही दशकं तमाम भारतीयांच्या मनावर राज्य करणाऱ्या सचिनच्या पावलावर पाऊल टाकत किंग कोहलीने आपल्या आदर्श खेळाडूचा विक्रम मोडून इतिहास रचला. वन डे विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक (५०) शतकं झळकावणारा विराट कोहली पहिला खेळाडू ठरला आहे. विराट कामगिरीनंतर सचिन तेंडुलकरने देखील कोहलीचे अभिनंदन केले. सचिनने एक पोस्ट लिहून 'विराट' खेळीला दाद दिली.

सचिनने पोस्टच्या माध्यमातून विराटसाठी लिहले, "जेव्हा मी पहिल्यांदा तुला ड्रेसिंग रुममध्ये भेटलो तेव्हा इतर सहकाऱ्यांनी तुला माझ्या पाया पडायला सांगून तुझ्यासोबत प्रँक केले होते... त्या दिवशी मला हसू आवरता आले नाही. पण लवकरच तू तुझ्या उत्कटतेने आणि कौशल्याने माझ्या हृदयाला स्पर्श केलास... तो तरूण मुलगा 'विराट' खेळाडू झाला आहे याचा मला खूप आनंद वाटतो. एका भारतीयाने माझा विक्रम मोडला यापेक्षा जास्त आनंद मला होऊ शकत नाही. मोठ्या व्यासपीठावर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत तू ही किमया साधली तेही माझ्या घरच्या मैदानावर."

तत्पुर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्माने २९ चेंडूत ४७ धावांची स्फोटक खेळी केली. त्यानंतर शुबमन गिलने (७९) धावांची अप्रतिम खेळी करून डाव पुढे नेला. पण दुखापतीमुळे गिलला मैदान सोडावे लागले अन् श्रेयस अय्यरचे खेळपट्टीवर आगमन झाले. विराट कोहलीने सावध खेळी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली, तर अय्यरने आक्रमक पवित्रा धारण करून किंग कोहलीला चांगली साथ दिली. विराटने ११७ चेंडूत ११३ धावांची शतकी खेळी करून इतिहास रचला. वन डे विश्वचषकाच्या इतिहासात शतकांचे अर्धशतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. २ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने विराटने चाहत्यांची मनं जिंकली. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहलीसचिन तेंडुलकर