भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात टी-२० मालिकेद्वारे करीत आहे. कॅरेबियन संघ याच प्रकारात सर्वांत बलाढ्य मानला जातो. फ्लोरिडा क्रिकेटमधील छोट्या प्रकारचे स्थायी केंद्र बनले असून याद्वारे जगाच्या या कोपºयात क्रिकेट लोकप्रिय होईल, अशी आशा आहे.विश्वचषकानंतर संघाच्या सपोर्ट स्टाफसाठी ही अखेरची मालिका असेल. सहयोगी स्टाफचा प्रत्येक सदस्य पुनर्नियुक्तीच्या आशेने संघासोबत आला असावा. मालिकेत कागदावर जरी भारत बलाढ्य वाटत असला तरी या प्रकारात प्रतिस्पर्धी संघाकडून आव्हान मिळू शकते.
श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंतसारख्या युवा चेहऱ्यांना संघात स्थान मिळविण्याची ही सुवर्ण संधी असेल. विश्वचषकानंतर प्रत्येक संघ पुनर्बांधणीच्या प्रक्रियेतून जात आहे. दरवर्षी कुठली ना कुठली विश्वदर्जाची स्पर्धा आयोजित होत असल्याने केवळ विश्वचषक ध्यानात ठेवून क्रिकेट खेळणे योग्य नाही. मालिकेपाठोपाठ मालिका जिंकून वाटचाल करणे योग्य ठरते.भारताला विंडीजमध्ये तीन कसोटी सामने खेळायचे असल्याने यजमानांना सहजसोपे लेखून चालणार नाही. विंडीजने काही महिन्याआधी इंग्लंडमध्ये सरस कामगिरी केली. त्याच परिस्थितीत हा संघ भारताविरुद्ध खेळण्यास सज्ज आहे.
राहुल चहरबाबत मी फार उत्सुक आहे, आयपीएलमधील शानदार कामगिरीच्या बळावरच तो भारतीय संघात दाखल होऊ शकला.माझ्यामते कुण्या एका खेळाडूला विशिष्ट प्रकारचा खेळाडू असा ठप्पा लागू नये, हे मी आधीही म्हटले आहे, खेळात लय आणि सातत्य याला फार महत्त्व असते. युवा खेळाडूंना सर्वच प्रकारात संधी मिळायला हवी.सतत संधी दिल्यानंतर प्रतिभा पुढे आल्यास एखाद्या प्रकारासाठी त्याची तज्ज्ञ म्हणून निवड करता येईल. कुण्या खेळाडूची योग्यता समजून घेण्याआधीच त्याच्याबाबत पूर्वग्रह तयार करणे चुकीचे आहे.