Join us  

चांगली वागणूक आयपीएलसाठी निवडीचे निकष नाहीत- लक्ष्मण

सामन्याचा निकाल आपल्याकडे खेचून आणण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंनाच आयपीएल संघात स्थान मिळत असते. यासाठी कुणासोबत चांगला व्यवहार ठेवणे हा निकष मुळीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 4:08 AM

Open in App

 आयपीएलमध्ये स्थान मिळविण्यासाठी आॅस्ट्रेलियाचे खेळाडू विराट आणि त्याच्या सहकाऱ्यांचे लांगूलचालन करतात, त्यांच्याविरुद्ध शेरेबाजी करण्याचे टाळतात,’असा आरोप क्लार्कने काही दिवसांपूर्वी केला होता. लक्ष्मण हे सनरायजर्स हैदराबादचे मेंटर असून स्टार स्पोटर््सच्या क्रिकेट कनेक्टेड कार्यक्रमात बुधवारी ते म्हणाले, ‘तुम्ही कुणासोबत चांगले वागत असाल तर तुम्हाला आयपीएलमध्ये स्थान मिळेलच, असे होत नाही. कुठलाही संघ आपल्यासाठी लाभदायी ठरेल अशी खेळाडूंमधील कामगिरी पाहूनच त्याला संघात स्थान देतो.

सामन्याचा निकाल आपल्याकडे खेचून आणण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंनाच आयपीएल संघात स्थान मिळत असते. यासाठी कुणासोबत चांगला व्यवहार ठेवणे हा निकष मुळीच नाही, असे १३४ कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करणारे लक्ष्मण यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)‘लिलावाच्यावेळी देशासाठी दमदार कामगिरी करणाºया खेळाडूंचा आयपीएलसाठी नक्की विचार केला जातो. याउलट एखाद्या खेळाडूसोबत तुमची मैत्री असेल तर तो तुमची शिफारस करेल, असे मुळीच समजू नका.’

टॅग्स :आयपीएलभारतीय क्रिकेट संघ