Join us  

खूषखबर! डेव्हिड वॉर्नरच्या घरी आली 'धनाची पेटी'

या विश्वचषकात सर्वात जास्त धावा ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 5:16 PM

Open in App

सिडनी : इंग्लंडमध्ये सध्याच्या घडीला विश्वचषक सुरु आहे. या विश्वचषकात सर्वात जास्त धावा ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. त्याचबरोबर वॉर्नरच्या नावावर सर्वाधिक खेळीचाही आतापर्यंतच्या विक्रम आहे. या विश्वचषकात वॉर्नरने सर्वाधिक 166 धावांची खेळी साकारली आहे. त्यामुळे या विश्वचषकात वॉर्नर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरू शकतो. पण हे घडण्यापूर्वीच वॉर्नरच्या घरी 'धनाची पेटी' आली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाडकेल्याप्रकरणी वॉर्नरवर एका वर्षासाठी बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आयपीएलमध्ये वॉर्नरने धावांच्या राशी उभारल्या होत्या. आता विश्वचषकातही वॉर्नरने धावांची टांकसाळ उघडल्याचे पाहायला मिळाले आहे. आतापर्यंतच्या जवळपास प्रत्येक सामन्यात वॉर्नरची बॅट तळपलेली पाहायला मिळाली आहे. फक्त न्यूझीलंडविरुद्धचा सामना त्याला अपवाद ठरला आहे.

धावांचे डोंगर उभारताना वॉर्नरसाठी एक खूष खबर आली आहे. वॉर्नरला आज कन्यारत्न झालं आहे. वॉर्नरची पत्नी कँडीने आज मुलीला जन्म दिला आहे. वॉर्नरला यापूर्वीही दोन मुली आहेत. डेव्हिडने या नवजात मुलीचे नाव इस्ला रोज वार्नर असे ठेवले आहे.

 

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला. वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी सुरुवातीपासून दमदार फलंदाजीचा नमुना पेश करत १२१ धावांची सलामी दिली. त्यानंतर फिंचच्या रुपात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. फिंचने ५१ चेंडूंत ५ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५३ धावा केल्या.

फिंच असताना आणि बाद झाल्यावरही वॉर्नरच्या फलंदाजीमध्ये कसलाच फरक जाणवला नाही. बांगलादेशच्या गोलंदाजांवर वॉर्नर कायम तुटून पडत होता. वॉर्नरने यावेळी यंदाच्या विश्वचषकातील दुसरे शतक पूर्ण केले. शतक पूर्ण झाल्यावर वॉर्नरने बांगलादेशच्या गोलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घायायला भाग पाडले. वॉर्नरने या सामन्यात फटक्यांचा धडाकाच लावला होता. वॉर्नरने १४७ चेंडूंत १४ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर १६६ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

वॉर्नरला यावेळी उस्मान ख्वाजानेही चांगली साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १९२ धावांची भागीदारी रचली. ख्वाजाने या सामन्यात ७२ चेंडूंत १० चौकारांसह ८९ धावा केल्या.

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरआॅस्ट्रेलिया