Join us  

क्रिकेटच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 2007च्या T20 वर्ल्ड कपवर वेब सीरीज येणार...

महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने T20 World Cup जिंकला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 6:28 PM

Open in App

तुम्हाला 2007 मध्ये झालेला T20 World Cup लक्षात असेलच. क्रिकेटचे चाहते त्या विश्वचषकाचा अंतिम सामना कधीच विसरू शकत नाहीत. आजही चाहते त्या जुन्या सामन्याचे हायलाइट्स पाहत असतात. हा पहिला T20i वर्ल्ड कप होता, ज्याला महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने जिंकले होते. आता या विश्वचषकावर एक वेब सीरिज येणार आहे.

एक OTT प्लॅटफॉर्म या विश्वचषकावर वेब सीरिज बनवत असून, यातून पुन्हा एकदा 2007चा विश्वचषक अनुभवायला मिळणार आहे.  ही एक डॉक्यूमेंट्री बेस्ड वेब सीरिज असेल, ज्याला एक इंटरनेशनल प्रोडक्शन हाउस तयार करत आहे. या वेब सीरीजचे टायटल अद्याप फायनल झालेले नाही. या सीरिजमध्ये वर्ल्ड कपमध्ये सामील 15 असणार आहेत. या फिल्ममध्ये रिअल फुटेजचा वापर होणार आहे. 

टी 20 वर्ल्ड कप 2007 वर आधारित या चित्रपटाची निर्मिती UK बेस्ड फर्म One One Six Network करत आहे. गौरव बहिरवानी यांची ही कंपनी आहे. तसेच, ही फिल्म आनंद कुमार डायरेक्ट करणार आहेत. आनंद कुमारने Delhi Heights आणि Zila Ghaziabad सारखे चित्रपट बनवले आहेत. द कश्मीर फाइल्स, द ताशकेंट फाइल्स आणि वाणीसारक्या चित्रपटाचे लेखक सौरभ एम पांडे या सीरिजचे लेखन करणार आहे. ही सीरिज पुढील वर्षी प्रदर्शित होईल.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ऑफ द फिल्डवेबसीरिज
Open in App