Rohit Sharma, IND vs ENG : भारत-इंग्लंड पाचव्या कसोटीपूर्वी कर्णधार रोहित शर्माचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् त्याला या सामन्यातून माघार घ्यावी लागली. मालिकेत २-१ अशी आघाडी असताना पाचव्या कसोटीतून कर्णधाराच्या माघारीमुळे टीम इंडियाचे टेंशन वाढवले होते. पण, रिषभ पंत व रवींद्र जडेजा यांनी ते हलके केले. कर्णधार जसप्रीत बुमराहने अष्टपैलू कामगिरी करून दाखवली. या कसोटीनंतर भारतीय संघ तीन ट्वेंटी-२० व तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने पहिल्या व दुसऱ्या-तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांसाठी अशे दोन संघ जाहीर केले आहेत. त्या दोन्ही संघांचे नेतृत्व रोहितकडेच ठेवण्यात आले आहेत. पण, रोहित ट्वेंटी-२० मालिकेत खेळणार का?; या प्रश्नाचे उत्तर आज मिळाले.
लिसेस्टरशायर क्लबविरुद्धच्या सराव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहितचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तो आयसोलेशनमध्ये गेला. कसोटी सामन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत तो तंदुरूस्त होईल, त्याने माघार घेतलेली नाही, असे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड सांगताना दिसले. पण, BCCI ने ट्विट करून पाचव्या कसोटीत जसप्रीत बुमराह नेतृत्व करणार असल्याचे जाहीर केले आणि रोहित कोरोनातून सावरला नसल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, रोहितच्या मुलीचा एक व्हिडीओही व्हायरल झाला, त्यात बाबाला कोरोना झालाय असे ती सांगताना दिसली. पण, रोहित आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो ७ जुलैपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेत खेळणार आहे. आज नॉर्दन विरुद्धच्या ट्वेंटी-२० सराव सामन्यात तो खेळणार नसला तरी एडबस्टन येथे त्याने सरावाला सुरूवात केली आहे.
पहिल्या ट्वेंटी-20 साठी भारताचा संघ- रोहित शर्मा ( कर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दीनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्षदीप सिंग, उम्रान मलिक
दुसऱ्या व तिसऱ्या ट्वेंटी-20 साठी भारताचा संघ - रोहित शर्मा, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, उम्रान मलिका
इंग्लंडचा ट्वेंटी-२० संघ - जोस बटलर ( कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम कुरन, रिचर्ड ग्लीसन, ख्रिस जॉर्डन, लिएम लिव्हिंगस्टोन, डेवीड मलान, टायमल मिल्स, मॅथ्यू पर्किसन, जेसन रॉय, फिल सॉल्ट, रिस टॉप्ली, डेव्हिड विली.