'वर्ल्ड कप'आधी टीम इंडियाला मिळाली खुशखबर! रिषभ पंत 'या' संघाविरुद्ध करणार पुनरागमन?

रिषभ पंत नुकताच एका स्थानिक मॅचमध्ये खेळतानाचा व्हिडीओ झालाय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 03:16 PM2023-08-16T15:16:32+5:302023-08-16T15:17:09+5:30

whatsapp join usJoin us
Good news for Team India fans as Rishabh Pant returns to the cricket field video goes viral social media | 'वर्ल्ड कप'आधी टीम इंडियाला मिळाली खुशखबर! रिषभ पंत 'या' संघाविरुद्ध करणार पुनरागमन?

'वर्ल्ड कप'आधी टीम इंडियाला मिळाली खुशखबर! रिषभ पंत 'या' संघाविरुद्ध करणार पुनरागमन?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rishabh Pant comeback, Team India: भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचा ३० डिसेंबर २०२२ रोजी अपघात झाला होता. या भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर आणि काही शस्त्रक्रियांना सामोरे गेल्यानंतर, आता रिषभ पंत क्रिकेटच्या मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये म्हणजेच NCA मध्ये रिषभची पुनर्वसन प्रक्रिया सुरू आहे. दुखापतीनंतर तो वेगाने तंदुरुस्त होताना दिसतोय. भारतीय क्रिकेट चाहते लवकरच त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. त्यातच पंतच्या पुनरागमनाबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

पंत मैदानावर परतला, 'या' मालिकेतून करू शकतो पुनरागमन...

रिषभ पंत दिल्लीत फलंदाजी मैदानावर करताना दिसला. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंत मैदानावर जाताना मैदानाला नमस्कार करतो आणि नंतर फलंदाजीला जातो. रिषभ पंत क्रीजवर येतो आणि तो काही शॉट्स खेळतो. मात्र, तो फारसा धावपळ करताना दिसत नाही. या व्हिडिओवरून असे दिसते की अपघातानंतर रिषभ पंतची रिकव्हरी खूप वेगाने होत आहे आणि तो लवकरच टीम इंडियामध्येही खेळताना दिसू शकेल.

स्पोर्ट्स टुडेच्या वृत्तानुसार, ऋषभ पंतची प्रकृती ज्या प्रकारे तंदुरुस्त होत आहे, ते पाहता तो भारतात इंग्लंड सोबतच्या कसोटी मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका जानेवारी ते मार्च २०२४ दरम्यान खेळवली जाणार आहे. या मालिकेतून त्याचे पुनरागमन होऊ शकते.

रिषभ पंतची प्रकृती कशी?

NCA कडून मिळालेल्या वृत्तानुसार, फिटनेससोबतच रिषभ पंतने आता नेटवर फलंदाजीचा सराव सुरू केला आहे. सुरुवातीला तो कमी वेगाच्या चेंडूंचा सामना करत होता, पण आता तो ताशी १४० किमी वेगाने येणाऱ्या चेंडूंचा सामना करताना दिसत आहे. हे पाहता, तो इंग्लंडसोबतच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान टीम इंडियामध्ये सामील होऊ शकतो अशी चर्चा आहे.

Web Title: Good news for Team India fans as Rishabh Pant returns to the cricket field video goes viral social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.