मुंबई : भारतासाठी एक आनंदाची बातमी सर्वांसमोर आली आहे. भारताच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. कारण भारताच्या जीएस लक्ष्मी यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मॅच रेफरी या पदावर नियुक्त केले आहे.
यापूर्वी जीएस लक्ष्मी यांना पुरुषांच्या मॅचमध्ये अंम्पायरिंग करणारी पहिली भारतीय महिला पंच, हा बहुमान मिळाला होता. त्यानंतर आता त्यांना मॅच रेफरी हे पद देण्यात आले आहे.
याबाबत जीएस लक्ष्मी यांनी सांगितले की, " माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. एक खेळाडूपासून सुरु झालेला हा प्रवास आता मॅच रेफरीपर्यंत येऊन ठेपला आहे. या प्रवासात बराच कालावधी गेला आहे. मी आयसीसीचे आणि बीसीसीआयचे आभार मानू इच्छिते. कारण त्यांनी मला ही संधी दिली. "