गुडन्यूज! वर्ल्डकप फायनलसाठी मुंबईतून स्पेशल ट्रेन; रेल्वेनं दिलं टाइम टेबल

दोन पराभवांनी वर्ल्ड कपची सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने अचंबित करणारी झेप घेतली अन् थेट फायनलमध्ये एन्ट्री मारली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 04:41 PM2023-11-17T16:41:09+5:302023-11-17T16:42:40+5:30

whatsapp join usJoin us
Good news! Special train from Mumbai for World Cup final india vs australia; Railway gave the time table | गुडन्यूज! वर्ल्डकप फायनलसाठी मुंबईतून स्पेशल ट्रेन; रेल्वेनं दिलं टाइम टेबल

गुडन्यूज! वर्ल्डकप फायनलसाठी मुंबईतून स्पेशल ट्रेन; रेल्वेनं दिलं टाइम टेबल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - न्यूझीलंडचा पराभव करत भारताने विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तर, द. आफ्रिलेला पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाकडून सेमी फायनलमध्ये पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम लढत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आता देशभरात क्रिकेट फिव्हर निर्माण झाला आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमचं बुकींग फुल्ल झालं असून मुंबईतून हजारो क्रिकेटप्रेमी अहमदाबादला जाणार आहे. त्यांची सोय व्हावी म्हणून मध्य रेल्वेने वर्ल्डकप स्पेशल ट्रेन सुरू केली आहे. यासंदर्भातील टाईमटेबलही मध्य रेल्वेने शेअर केलं आहे. 

दोन पराभवांनी वर्ल्ड कपची सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने अचंबित करणारी झेप घेतली अन् थेट फायनलमध्ये एन्ट्री मारली. २१२ धावांचा बचाव करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनेही जीवाचे रान केले, परंतु ऑस्ट्रेलियन्सच्या चिकाटीसमोर ते फेल गेले. ट्रॅव्हिस हेड व डेव्हिड वॉर्नर यांच्या आक्रमक सुरुवातीनंतरही आफ्रिकन फिरकीपटूंनी सामन्यात रंगत आणली होती. पण, चोकर्स हा बसलेला ठप्पा पुन्हा एकदा अधोरेखित झाला. आता, ऑस्ट्रेलिया आठव्यांदा वर्ल्ड कप फायनल खेळणार आहेत. १९ नोव्हेंबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-ऑस्ट्रेलिया फायनल ( India vs Australia Final) होईल. २००३ च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडियाही सज्ज आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींची उत्सुकता असून प्लॅनिंग होत आहे. रविवारच्या दिवशी सामन्याची मजा घेण्यासाठी सर्वचजण आपआपलं नियोजन करत आहेत. त्यात, मध्य रेल्वेने अहमदाबादला जाणाऱ्या क्रिकेटप्रेमींसाठी गुडन्यूज दिलीय. मध्य रेल्वेने मुंबई ते अहमदाबाद विशेष ट्रेन सुरू केली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन ही ट्रेन सुटणार आहे. वर्ल्डकप स्पेशल ट्रेन म्हणून ही रेल्वे धावणार आहे. सीएसएमटी-अहमदाबाद-मुंबई अशी ही ट्रेन धावणार आहे. 

मुंबईतील सीएसएमटी, दादर, ठाणे, वसई, सुरत, वडोदरा, अहमदाबाद इत्यादी थांबे घेत ही स्पेशल ट्रेन धावणार असून ०११५३ हा गाडी नंबर आहे. १८ नोव्हेंबर रोजी सीएसएमटीवरुन ही ट्रेन रात्री १०.३० वाजता निघणार आहे. अहमदाबादला सकाळी ६.४० वाजता ही रेल्वे पोहोचेल. 


अहमदाबादहून मुंबईकडे येताना २० नोव्हेंबर रोजी रात्री १.४५ वाजता निघणार असून सकाळी १०.३५ वाजता ही ट्रेन मुंबईत पोहोचेल.  
 

Web Title: Good news! Special train from Mumbai for World Cup final india vs australia; Railway gave the time table

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.