वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन यानं दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घेतली आहे. त्यात या स्पर्धेसाठी निवडलेल्या संघातील सदस्य दीपक चहरनेही बुधवारी आपला गुडघा दुखवून घेतला. त्यामुळे तोही या मालिकेला मुकतो की काय, अशी चिंता वाटू लागली आहे. कसोटी संघाचा सदस्य वृद्धीमान साहा याच्या बोटावर शस्त्रक्रिया होणार आहे. टीम इंडियासाठी सर्व नकारात्मक गोष्टी घडत असताना बुधवारी सायंकाळी एक आनंदाची वार्ता समोर आली. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पुन्हा मैदानावर परतला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेनंतर हार्दिक दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना हा त्याचा अखेरचा वन डे सामना होता. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर त्यानं विश्रांती घेतली आहे. या स्पर्धेत त्याला दुखापत झाली होती. या विश्रांतीच्या काळात तो सरावापासूनही दूर होता. उपचारासाठी तो लंडनमध्येही गेला होता आणि तेथे यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्यानं तंदुरुस्तीसाठी कसून मेहनतही घेतली. त्याला त्याचे फळ मिळाले आहे आणि तो आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे.
त्यानं तंदुरुस्त झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात त्यानं लिहीलं की,''बरेच दिवस मी क्रिकेटपासून दूर होतो. त्यामुळे पुन्हा मैदानावर परतण्याचा आनंद काय असतो, हे मलाच माहित.''
हार्दिक पांड्याच्या पोस्टवर जसप्रीत बुमराहचा यॉर्कर, अन्...
हार्दिक पांड्याचे बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौटेलासाठी 'स्पेशल' गिफ्ट!