MS Dhoni's Number 7 : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियावर सक्रिय नसतो. पण, त्याची पत्नी साक्षी ही धोनीचे नवनवीन फोटो शेअर करून चाहत्यांना त्यांच्या लाडक्या कॅप्टन कूलची अपडेट देत असते. २०२० मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. पण, जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात आयपीएलमध्ये अद्याप तो खेळतो आहे. आयपीएलच्या आगामी हंगामात पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जच्या जर्सीत धोनीची झलक पाहायला मिळेल. खंर तर सोशल मीडियावर धोनी सक्रिय नसला तरी तो काही ना काही कारणावरून चर्चेचा विषय बनत असतो. आता तो त्याच्या जर्सी नंबर '७' वरून ट्रेंडमध्ये आला.
दरम्यान, गुगल इंडियाने देखील धोनीच्या ट्रेंडमध्ये सहभाग नोंदवत एक मिश्किल टिप्पणी केली. गुगलने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये नंबर ७ बद्दल काय खास आहे? असे विचारले असता उत्तरात म्हटले, "इंद्रधनुष्यात सात रंग आहेत, आठवड्याचे सात दिवस आहेत, जगात सात आश्चर्ये आहेत, सात मोठे समुद्र आणि महाद्विपांची संख्या देखील सात आहे."
तसेच दुसऱ्या कोणत्याही नंबरला सात क्रमांकासारखे वेगवेगळ्या क्षेत्रात इतके कनेक्शन आणि संदर्भ नाहीत. म्हणूनच हा खरोखरच खूप महत्त्वाचा क्रमांक आहे, असेही गुगलने पोस्ट केलेल्या फोटोत नमूद आहे. गुगलसह अनेकांनी 'याचे कारण थाला आहे, मेसेज स्पष्ट आहे', अशा प्रतिक्रिया या व्हायरल फोटोवर दिल्या आहेत. दरम्यान, आयपीएलच्या आगामी हंगामासाठी १९ तारखेला दुबईत मिनी लिलाव होणार आहे.
धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने कायम ठेवलेले खेळाडू - महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, मिचेल सँटनर, दीपक चहर, तुषार देशपांडे, मथीशा पथिराणा, समिरजीत सिंग, प्रशांत सोलंकी, महीष थीक्षणा, अजिंक्य रहाणे, शेख राशीद, निशांत सिंधू, अजय मंडल.
Web Title: Google India pays homage to cricket maestro former captain of team india M S Dhoni with number 7, read here details
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.