गोवा पर्यटनाला ग्रॅण्डमास्टर स्पर्धेचे ‘बळ’; २७ देशांतील बुद्धिबळपटू गोव्यात खेळणार

सध्या गोव्यात पर्यटनाचा हंगाम सुरु झाला आहे. देश-विदेशातील पर्यटक गोव्यात धडकत आहेत. त्यामुळे बरीच हॉटेल्स हाउसफुल्ल झालीत. त्यातच राज्यात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 03:20 PM2018-10-10T15:20:14+5:302018-10-10T15:21:30+5:30

whatsapp join usJoin us
Grandmaster Competition will boost Goa Tourism | गोवा पर्यटनाला ग्रॅण्डमास्टर स्पर्धेचे ‘बळ’; २७ देशांतील बुद्धिबळपटू गोव्यात खेळणार

गोवा पर्यटनाला ग्रॅण्डमास्टर स्पर्धेचे ‘बळ’; २७ देशांतील बुद्धिबळपटू गोव्यात खेळणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- सचिन कोरडे 
सध्या गोव्यात पर्यटनाचा हंगाम सुरु झाला आहे. देश-विदेशातील पर्यटक गोव्यात धडकत आहेत. त्यामुळे बरीच हॉटेल्स हाउसफुल्ल झालीत. त्यातच राज्यात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सुद्धा गोवा पर्यटनाला ‘बुस्ट’ देणारी ठरेल.  कारण, या स्पर्धेच्या निमित्ताने २७ देशांतील खेळाडू गोव्यात दाखल होणार आहेत. या खेळाडूंसाठी गेल्या महिन्याभरापूर्वी सात-आठ मोठी हॉटेल्स बुकिंग करण्यात आली होती. त्यामुळे पर्यटकांना हॉटेल्स मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गोवा हे पर्यटकांबरोबरच खेळाडूंनाही आकर्षित करते. प्रत्येक खेळाडूला गोव्यात खेळण्याची इच्छा असते. मग तो भारतीय असो किंवा विदेशी. कारण त्यांना गोव्यात आल्यानंतर खेळाबरोबरच पर्यटनाचाही आनंद लुटण्याची त्यांना संधी मिळते. त्यामुळे पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या स्पर्धेला जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.  या प्रतिसादाचे गोवा बुद्धिबळ संघटनेलाही आश्चर्य वाटत आहे आणि म्हणूनच खेळाडूंची व्यवस्था व स्पर्धेचा तामजाम करताना स्थानिक आयोजकांची धावपळ होत आहे. या स्पर्धेला सरकारने पूर्ण पाठींबा दिल्याने आम्हाच्या अडचणी दूर झाल्यात. स्पर्धेचा प्रतिसाद पाहता आम्ही सुद्धा चकीत झालो आहे, असे गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव किशोर बांदेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर१३ ते २० आक्टोबर दरम्यान होणाºया या स्पर्धेत २१ देशांचे एक हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत. त्यात २२ आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर्स असतील. स्पर्धा तीन गटांत होईल. त्यात एलिट गटात २६० तर ‘ब’ आणि ‘क’ गटात एकूण ९०० प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. खेळाडूंसाठी निवास, भोजन आणि प्रवास यांची व्यवस्था करण्यात आली आहे.  गोवा बुद्धिबळ संघटनेच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित या स्पर्धेत चार ते पाच सुपर ग्रॅण्डमास्टर्स, २२ ग्रॅण्डमास्टर्स, आंतरराष्ट्रीय मास्टर्स, महिला ग्रॅण्डमास्टर्स व इतर राष्ट्रीय चॅम्पियन्स सहभागी झाले आहेत.  

दरम्यान, गोव्यात २००२ मध्ये  विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली होती. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा झाली होती. त्यानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर आायेजित केलेली ही ग्रॅण्डमास्टर्स स्पर्धा आहे.  

ऑलिम्पिकसाठी प्रस्ताव
बुद्धिबळ या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश व्हावा, यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. जॉर्जिया येथे सुरु असलेल्या चेस ऑलिम्पियाडमध्ये १८६ देशांतील ४ हजार खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यामुळे ऑलिम्पिक प्रवेशाचे द्वार खुले असल्याचे किशोर बांदेकर यांनी सांगितले.
 

बक्षिसांची खैरात 
या स्पर्धेतील विजेत्यांसाठी एकूण ३४ लाखांची बक्षिसे देण्यात येतील. त्यातील एलिट गटातील विजेत्यास २.५ लाख रुपये, उपविजेत्यास २ लाख रुपये तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या खेळाडू अनुक्रमे १ लाख,  ८५ हजार आणि ७५ हजार रुपये देण्यात येतील. पहिल्या ४० खेळाडूंना रोख बक्षिसे देण्यात येतील. ‘ब’ गटातील विजेत्या खेळाडूस १ लाख ४० हजार रुपये, उपविजेत्यास १ लाख १५ हजार रुपये दिले जातील. ‘क’ गटातील विजेत्यास १ लाख २५ हजार रुपये व उपविजेत्यास १ लाख रुपये दिले जातील. याशिवाय इतर वैयक्तिक बक्षिसेही असतील.

Web Title: Grandmaster Competition will boost Goa Tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.