माऊंट मोनगानुई : भारतीय संघ मंगळवारी न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या व अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ‘व्हाईटवॉश’ टाळण्यासाठी प्रयत्नशील राहील. दुखापतग्रस्त नियमित कर्णधार केन विलियम्सनविना खेळल्यानंतरही यजमान संघाने टी२० मालिकेतील लाजिरवाणा पराभव विसरून पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवत मालिका जिंकली. विलियम्सन तंदुरुस्ती चाचणीत यशस्वी ठरला, तर तो अखेरच्या लढतीत खेळेल.
आघाडीच्या फळीची कामगिरी दोन्ही संघांमधील फरक स्पष्ट करणारी ठरली. रोहित शर्मा व शिखर धवन दुखापतीमुळे बाहेर असून विराट कोहली मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. फॉर्मात असलेला लोकेश राहुल फलंदाजी क्रमामध्ये खालच्या फळीत येत आहे. आघाडीची फळी भारतीय संघाची ताकद होती, पण या मालिकेत ही फळी सपशेल अपयशी ठरली. सलामीवीर पृथ्वी शॉ व मयांक अग्रवाल यांनी टप्प्याटप्प्याने चांगली कामगिरी केली, पण भारताला अपेक्षित सुरुवात करून देण्यात ते अपयशी ठरले.
भारताला रोहितची उणीव भासली. रोहितने गेल्या १२ महिन्यांत एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५७.३० च्या सरासरीने धावा केल्या. त्याच्या अनुपस्थितीत धावा फटकावण्याची जबाबदारी पूर्णपणे कोहलीवर आली. त्याने दोन सामन्यांत ६६ धावा केल्या. गेल्यावेळी २०१९ मध्ये भारताने येथे एकदिवसीय मालिका ४-१ ने जिंकली होती, पण टी२० मालिका २-१ ने गमावली होती.
श्रेयस अय्यरने एक शतक व एक अर्धशतक झळकावले, पण रॉस टेलरने दोन्ही सामन्यांत भारतावर वर्चस्व गाजवले. अय्यर ‘फिनिशर’ म्हणून अपयशी ठरला. टेलरने मात्र ही जबाबदारी योग्यप्रकारे निभावली. (वृत्तसंस्था)मैदाने समजून घेणे आवश्यक - ठाकूरन्यूझीलंडप्रमाणे मैदाने कुठेच नसून या मैदानांना समजून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक सामन्यात गोलंदाजाला आपल्या रणनीतीमध्ये बदल करावा लागतो. आॅकलंडमध्ये पुढील सीमारेषा लहान असून हॅमिल्टनमध्ये साईड बाऊंड्री छोटी होती. प्रत्येक मैदानाचा आकार वेगळा असल्याने त्याला समजून घेणे आवश्यक आहे. पुढील सामन्यात मैदान मोठे आहे. अशा प्रकारच्या मैदानावर तुम्ही रोज खेळत नाही. त्यामुळेच न्यूझीलंडमध्ये खेळणे सोपे नाही. दुसºया दिवशी सामन्यात जशा प्रकारे गोलंदाजी करायची असते, तशी गोलंदाजी नेट््समध्ये सरावादरम्यान करावी लागते. मानसिक तयारी असणे आवश्यक आहे, कारण तसे नसेल तर प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला चकीत करेल. त्यांचे फलंदाज वाºयाची दिशा व लहान सीमारेषेचा पूर्णपणे लाभ घेतात. - शार्दुल ठाकूरविराटला बाद करण्याचे श्रेय खेळपट्ट्यांना - साऊदीआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा विराट कोहलीला बाद करणारा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीने याचे श्रेय खेळपट्ट्यांना दिले. साऊदीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये कोहलीला ९ वेळा बाद केले. तो म्हणाला, ‘कोहली शानदार असून त्याच्या खेळात फार उणिवा नाहीत. नव्या चेंडूने मारा करताना खेळपट्टीकडून मदत मिळत असून योग्य दिशा व टप्पा राखून मारा केला तर यश मिळते.’1राहुल, शॉ, अय्यर, केदार जाधव व युझवेंद्र चहल यांचा सोमवारी एच्छिक सराव सत्रात सहभाग नव्हता. कोहली सर्वप्रथम सरावासाठी आला. त्याने वेगवान गोलंदाज व फिरकीपटूंविरुद्ध फलंदाजीचा सराव केला. मनीष पांडे त्यानंतर फलंदाजीच्या सरावासाठी नेट््समध्ये दाखल झाला तर रिषभ पंतनेही प्रदीर्घ वेळ सराव केला. आॅस्ट्रेलियाविरुद्ध दुखापतग्रस्त झाल्यानंतर पंत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळला नाही. गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमीचा अपवाद वगळता अन्य सर्व गोलंदाजांनी सराव केला.2न्यूझीलंडने लेग स्पिनर ईश सोढी व वेगवान गोलंदाजब्लेयर टिकनेर यांचा संघात समावेश केला आहे. सोढीने कोहलीला हॅमिल्टनमध्ये गुगलीवर बाद केले होते.3सोढी व टिकनेर न्यूझीलंड ‘अ’ संघाचे प्रतिनिधित्व करीत होते. भारत ‘अ’विरुद्ध लिंकनमध्ये अनिर्णीत संपलेल्या दुसºया अनधिकृत कसोटी सामन्यात त्यांचा सहभाग होता, पण ते चौथ्या व अखेरच्या दिवशी खेळात सहभागी झाले नाहीत. न्यूझीलंड संघातील टिम साऊदी व मिशेल सँटनेर पोटदुखीमुळे त्रस्त आहेत, तर स्कॉट कुग्लेनला ताप आला आहे.