ठळक मुद्देयापूर्वी झालेल्या सामन्यात भारतीय संघाला मिळाला होता विजय.
चेम्सफोर्ड : इंग्लंडविरुद्धचा दुसरा टी-२० सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधलेल्या भारतीय महिला क्रिकेटपटूंचा आत्मविश्वास उंचावला. या जोरावरच बुधवारी रंगणारा अखेरचा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा निर्धार भारतीय महिलांचा असेल. जबरदस्त क्षेत्ररक्षण व फिरकीपटूंच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारतीयांनी रविवारी दुसऱ्या टी-२० सामन्यात ८ धावांनी बाजी मारत इंग्लंडला नमवले. याआधी २०१९ साली भारतीय महिलांनी अखेरची मालिका जिंकलेली ती वेस्ट इंडिजविरुद्ध. त्यानंतर आता टी-२० मालिका विजय मिळवण्याची सुवर्ण संधी भारतीय संघाकडे असेल.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधाना, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, रिचा घोष, हरलीन देओल, स्नेह राणा, तानिया भाटिया, इंद्राणी रॉय, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्ट, राधा यादव आणि सिमरन दिल बहादूर.
इंग्लंड : हीथर नाइट (कर्णधार), टॅमी ब्युमोंट, कैथरीन ब्रंट, फ्रेया डेविस, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, टॅश फरांट, सारा ग्लेन, एमी जोन्स, नेट स्किवर, आन्या श्रबसोल, मैडी विलियर्स, फ्रेन विल्सन आणि डैनी वायट.
Web Title: Great chance for Indians to win T20 series englad women cricket team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.