ठळक मुद्देमैदानातील त्यांच्या कामगिरीबरोबरच वैयक्तिक जीवनातही यांच्याबद्दल जोरदार चर्चा होतेकेन विलियम्स आपले सार्वजनिक आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य यांची गफलत होऊ देत नाही.
नवी दिल्ली, दि. 15 - यशस्वी क्रिकेटपटूच्या वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतार जाणून घेण्यात माध्यमांइतकाच सर्वसामान्यांना रस असतो. क्रिकेटपटू आणि सौदर्यवतींच्या प्रेम प्रकरणांवर माध्यमांमध्ये खमंग चर्चा होते. फॅनला आपल्या आवडत्या खेळाडूंच्या आयुष्यात कोण आहे? हे जाणून घेण्याची कल्पकता आसते. सध्याच्या फॅब - 4 मधील एक जण चक्क नर्सच्या प्रेमात पडला आहे.
जगातील फॅब-4 म्हणून एकावेळी सचिन, लारा, पॉन्टिंग आणि जयसूर्या यांना ओळखले जायचे. हे खेळाडू त्यांच्या जबदस्त कामगिरीमुळे ओळखले जात असत. गेल्या 2-3 वर्षांपासून अशीच एक फॅब-4 ची नवी चौकड जन्माला आली. मैदानातील त्यांच्या कामगिरीबरोबरच वैयक्तिक जीवनातही यांच्याबद्दल जोरदार चर्चा होते. या फॅब-4 पैकी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, इंग्लडं संघाचा कर्णधार जो रूट आणि ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार स्मिथ यांनी कधीही आपली वैयक्तिक लाइफ अर्थात खाजगी आयुष्य लपवून ठेवले नाही. परंतु फॅब- 4 पैकी केन विलियम्स मात्र आपले सार्वजनिक आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य यांची गफलत होऊ देत नाही.
(आणखी वाचा : विराट कोहली कसोटीच्या मैदानात खेळतो 'बुद्धिबळ', प्रतिस्पर्धी होतो 'चेकमेट' )
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यमसन हा सध्याच्या क्रिकेट जगतातील एक टॅलेंटेड व गुणवान खेळाडू मानला जातो. मात्र, विल्यमसन मैदानात जितका खुलून खेळतो तितका मात्र खासगी आयुष्यात नाही. तो आपली पर्सनल लाईफ खूपच खासगी ठेवतो. त्याच्या गर्लफ्रेंडबाबत खूपच कमी लोक जाणतात.
(आणखी वाचा : हे आहेत दहा भारतीय श्रीमंत क्रिकेटपटू, पाचव्या क्रमांकाचे नाव वाचून थक्क व्हाल... )
मीडिया रिपोर्टप्रमाणे न्यूझीलँडचा हा प्रतिभावान कर्णधार एका नर्सच्या प्रेमात आहे. केनच्या गर्लफ्रेंडचे नाव आहे सारा रहीम आहे. प्रोफेशननने नर्स असलेली सारा ही मूळची ब्रिटिश आहे. या जोडीला हॉलिडेवर असताना अनेक वेगवेगळ्या बीचवर पाहण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही केनने मीडियाशी आपल्या रिलेशनशिपबाबत कधीच काही बोलला नाही. 2016 सालानंतर ही जोडी खऱ्या अर्थाने चर्चेत आली जेव्हा केन आणि सारा ऑकलँडमध्ये झालेल्या अवॉर्ड समारंभात एकत्र दिसले. या सेरेमनीमध्ये न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने केनला बेस्ट स्पोर्ट्समॅन ऑफ द ईयर हा अवॉर्ड दिला होता.
(आणखी वाचा : मिताली राजला शुभेच्छा देताना विराट कोहलीची झाली "गोची" )
फॅब- 4 मधील जो रूट मे 2016 मध्ये कॅर्रीय कोट्टेरेल बरोबर एंगेजेड झाला आहे. तर स्टिव्ह स्मिथ डॅनी विलिसबरोबर एंगेजेड झाला. विराट कोहली हा बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा बरोबर डेटिंग करत आहे.
Web Title: This is a great cricketer in love with a nurses
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.