भारतीय क्रिकेटचे भविष्य ग्रेटच

पाचवा आणि अखेरचा सामना जिंकत भारताने वन डे रॅँकिंगमध्ये नंबर वन होण्याचा मान मिळवला. चौथ्या सामन्यात पराभव झाल्यानंतर असे वाटले होते की, आॅस्ट्रेलियाकडे तराजू झुकेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 02:41 AM2017-10-03T02:41:37+5:302017-10-03T02:41:56+5:30

whatsapp join usJoin us
Great future of Indian cricket | भारतीय क्रिकेटचे भविष्य ग्रेटच

भारतीय क्रिकेटचे भविष्य ग्रेटच

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाझ मेमन, संपादकीय सल्लागार

पाचवा आणि अखेरचा सामना जिंकत भारताने वन डे रॅँकिंगमध्ये नंबर वन होण्याचा मान मिळवला. चौथ्या सामन्यात पराभव झाल्यानंतर असे वाटले होते की, आॅस्ट्रेलियाकडे तराजू झुकेल. मात्र, त्यांच्यात कमतरता दिसून आल्या. अखेरच्या सामन्यात ते पूर्णत: भरकटले. फिंच आणि वॉर्नर यांच्या चांगल्या सुरुवातीनंतरही त्यांची गाडी रुळावरून घसरली. मी हे नाही म्हणणार की, आॅस्ट्रेलियाची फलंदाजी खराब होती; पण ज्या पद्धतीने भारतीय गोलंदाजांनी त्यांना रोखले ते महत्त्वपूर्ण ठरले. २५० धावसंख्येपर्यंत आॅस्ट्रेलियासारख्या संघाला रोखणे सोपे नसते. शानदार गोलंदाजीनंतर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ती कौतुकास्पद आहे; कारण नागपूरची खेळपट्टी फलंदाजीसाठी इतकी सोपी नव्हती. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही क्षेत्रांत भारत अव्वल ठरला. या कामगिरीवरून माजी विश्वविजेता भारतीय संघ हा नंबर वनच्या लायक आहे, हे म्हणायला हरकत नाही.
या विजयात भारताचे बरेच हिरो होते. कुण्या एका आणि दोघांचे नाव घेणे उचित ठरणार नाही. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे यांची चमक होतीच. शिवाय विराट कोहलीनेही दमदार योगदान दिले. अजिंक्यने तर सलग चार अर्धशतके ठोकली. अशी कामगिरी करीत त्याने निवडकर्त्यांना संदेश दिला की त्याला आता बाहेर ठेवता येणार नाही. याशिवाय युजवेंद्र चहल, कुलदीप यादव या नव्या दमाच्या फिरकीपटूंनाही दाद द्यावी लागेल.
बुमराह हा डेथ ओव्हरमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करतो. हार्दिक पांड्यानेही लक्ष वेधले. कर्णधार विराट कोहलीने त्याचे कौतुक केले. पांड्यासारखे ‘क्लिन स्टायकर्स’ या मॉडर्न गेममध्ये कमी असतात. जेव्हाही तो गोलंदाजी करतो तेव्हा विकेट मिळवून देतो आणि फलंदाजीत योगदान देतो. युवा आणि काही वरिष्ठ खेळाडूंमधील ताळमेळ पाहता मला भारतीय क्रिकेटचे भविष्य ग्रेटच दिसते.

Web Title: Great future of Indian cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.