पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक लेह दौरा करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय. मोदींनी लेह लडाख सीमारेषेवर जाऊन देशातील जवानांचे मनोबल वाढविण्याचं काम केलंय. मोदींनी सीमारेषेवरील तैनात जवानांना संबोधित करताना, आपलं शौर्य हिमालयाच्या उंचीपेक्षाही मोठं असल्याचं म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीलडाख सीमारेषेवर जाऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मोदींच्या लेह भेटीचे फोटो काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मोदींच्या या भेटीवर भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवननं केलेलं ट्विट आता व्हायरल होत आहे.
गेल्या महिन्यात भारतीय सैन्यावर चीनने हल्ला केला. यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले तर चीनचे 40 हून अधिक जवान मारले गेले. यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणावाची स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज थेट लेह गाठत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. यावेळी, मोदींनी सैन्याला संबोधित करत, त्यांना धीर देत देशाची 130 कोटी जनता आपल्यासोबत असल्याचे म्हटलं आहे. आत्मनिर्भर भारताचा संकल्प आपल्या त्याग आणि बलिदानातूनच मजबूत होणार असल्याचे मोदींनी म्हटले.
शिखर धवननं ट्विट केलं की.''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तम नेतृत्वगुणाची झलक दाखवून दिली. लेह येथे आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या जवानांसाठी ही भेट मनोबल वाढवणारी ठरेल, हे नक्की.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
बाबो: 89 वर्षांचे वडील अन् 65 वर्षांची बहीण; फॉर्म्युला वनच्या माजी बॉसला पुत्ररत्न!
सुशांत सिंग राजपूतचा मित्र अन् दिग्गज बॉक्सरवर कोसळला दुःखाचा डोंगर!
Fact check: चीनला विरोध करणाऱ्या हाँगकाँगच्या आंदोलकांमध्ये खरंच दिसले का किम जोंग-उन?
ENGvsWI : इंग्लंड संघावर कोरोना संकट? खेळाडूची प्रकृती अचानक बिघडली, झाला सेल्फ आयसोलेट
इरफान पठाणला 'पुढील हाफिज सईद' म्हणणाऱ्या पोस्टवर बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा म्हणते...
पाकिस्तानी खेळाडूचा प्रताप; वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान पत्नीला लपवलं होतं कपाटात
2011ची वर्ल्ड कप फायनल फिक्स्ड? श्रीलंकन पोलिसांनी घेतला मोठा निर्णय