-सुनील गावसकर लिहितात...विराट कोहलीने आपले नाव ‘विराट’ हे सिद्ध केले आहे. गोष्ट केवळ रोज नोंदविल्या जाणा-या नव्या विक्रमांची नसून त्याने आपल्या नेतृत्वाखाली संघाला नवी उंची गाठून दिली आहे. दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच भूमीत पराभूत करणे आणि तेही मोठ्या फरकाने, हे यापूर्वी कधीच शक्य झाले नव्हते. या शानदार विजयामध्ये विराट कोहलीला गोलंदाजांचे पूर्ण सहकार्य लाभले, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कसोटी मालिकेतील पराभवानंतरही येथे भारतीय गोलंदाजांनी ६० बळी घेतल्याचे प्रथमच अनुभवायला मिळाले. पहिल्या दोन कसोटी सामन्यांत चौथ्या डावातील कमकुवत कामगिरीमुळे संघाला पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाची गोलंदाजीची बाजू मजबूत होती. वेगवान व फिरकीपटू यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. बुमराह, शमी, भुवनेश्वर कुमार यांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांविरुद्ध त्यांच्याच भूमीत वर्चस्व गाजवले, हा एक नवा अनुभव होता.आता अतिझटपट क्रिकेटची रंगत अनुभवायला मिळणार आहे. दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व नवा कर्णधार जेपी ड्युमिनी करीत आहे. त्याला टी-२० क्रिकेटमध्ये अनुभवी खेळाडू मानले जाते. वन-डे मालिकेतील निराशाजनक कामगिरीमुळे रुळावरून घसरलेली गाडी पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी ही मालिका म्हणजे दक्षिण आफ्रिका संघाला संधी आहे. टी-२० क्रिकेटमध्ये काही चेंडूंमुळे सामन्याचे चित्र पालटते. अखेरच्या क्षणापर्यंत उंचावलेल्या मनोधैर्यासह खेळणारा संघ बाजी मारतो.भारतीय खेळाडूंसाठी प्रदीर्घ दौºयानंतर मायदेशी परतण्यापूर्वी हा अखेरचा आठवडा आहे. कुटुंबाला भेटण्याच्या उत्सुकतेमुळे पराभूत होण्याचा धोका असतो, पण कोहलीच्या नेतृत्वाखाली हे अशक्य आहे. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत यजमान संघाविरुद्ध चमकदार कामगिरी करताना बघणे अभिमानाची बाब आहे. संघाचीही विजयी मोहीम अखेरच्या लढतीपर्यंत कायम राहील, अशी आशा आहे. (पीएमजी)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- द ग्रेट विराट !
द ग्रेट विराट !
विराट कोहलीने आपले नाव ‘विराट’ हे सिद्ध केले आहे. गोष्ट केवळ रोज नोंदविल्या जाणा-या नव्या विक्रमांची नसून त्याने आपल्या नेतृत्वाखाली संघाला नवी उंची गाठून दिली आहे. दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच भूमीत पराभूत करणे आणि तेही मोठ्या फरकाने, हे यापूर्वी कधीच शक्य झाले नव्हते.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 1:17 AM