आशिया कपमध्ये खच्चून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानी संघ आता वर्ल्डकपची तयारी करत आहे. भारतात येणार नाही असा सूर गेल्या काही महिन्यांपासून पीसीबीचा आहे. असे असताना भारत-पाकिस्तान सामन्याच्या चाहत्यांसाठ महत्वाची बातमी आहे. भारताने पाकिस्तानी संघाला व्हिसा मंजूर केला आहे. अफगाणिस्तानला देखील व्हिसा मिळाला आहे.
पाकिस्तानी संघाला २७ सप्टेंबरला हैदराबादला पोहोचायचे आहे. दोन दिवस आधीच भारताने व्हिसा मंजूर केला आहे. पाकिस्तानने १९ सप्टेंबरला व्हिसासाठी अर्ज केला होता. यामुळे लवकरात लवकर प्रक्रिया आटोपून भारताने व्हिसा मंजूर केला आहे.
व्हिसा मिळण्यास उशीर झाल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड संतापलेला होता. आयसीसीकडे याबाबत तक्रार केली होती. व्हिसाला उशीर झाल्यास पाकिस्तान संघाच्या तयारीवर परिणाम होऊ शकतो, असे पीसीबीने म्हटले होते.
आता पाकिस्तानला २७ तारखेला भारतात यायचे आहे. यानंतर २९ सप्टेंबरला पहिला सराव सामना होणार आहे. पाकिस्तान नेदरलँड्सविरुद्ध वर्ल्ड कपमधील पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये खेळणार आहे.
विश्वचषकासाठी पाकिस्तान क्रिकेट संघ:बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाम उल हक, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, शाहीन आफ्रिदी, उसामा मीर, सौद शकील, हरिस रौफ , मोहम्मद वसीम जूनियर