Join us  

बार्कले पुन्हा बनले आयसीसी चेअरमन, जय शाह अर्थ समितीच्या प्रमुखपदी

ICC: न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांची शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) चेअरमनपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली. बार्कले यांच्याशिवाय आयसीसीच्या सर्वांत ताकदवान अर्थ आणि पणन समितीच्या प्रमुखपदी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची निवड झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 5:55 AM

Open in App

मेलबोर्न : न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांची शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) चेअरमनपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली. बार्कले यांच्याशिवाय आयसीसीच्या सर्वांत ताकदवान अर्थ आणि पणन समितीच्या प्रमुखपदी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची निवड झाली. बार्कले यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. झिम्बाब्वेचे तावेंग्वा यांनी नामांकन परत घेताच बार्कले यांच्या निर्विरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.  आयसीसी बोर्डाने बार्कले यांना आपला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. बार्कले नोव्हेंबर २०२० ला आयसीसी चेअरमन बनले. याआधी ते न्यूझीलंड क्रिकेटचे चेअरमन, तसेच २०१५ च्या आयसीसी पुरुष विश्वचषक स्पर्धेचे संचालक होते. त्यांना बीसीसीआयसह १७ सदस्यांच्या बोर्डाचा पाठिंबा मिळाला आहे.

‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या चेअरमनपदी फेरनिवड होणे माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मी आपले सहकारी, तसेच  सर्वच आयसीसी संचालकांचे पाठिंबा देण्यासाठी मी आभार मानतो.’- ग्रेग बार्कले, आयसीसी चेअरमन

शाह यांच्या नेतृत्वाखालील अर्थ आणि पणन समिती  मोठे आर्थिक निर्णय घेते. यानंतर आयसीसी बोर्ड या निर्णयांना मंजुरी प्रदान करते. आयसीसी चेअरमनइतकीच ही ताकदवान उपसमिती असते. शाह यांची या पदावर नियुक्ती होण्याचा अर्थ ते आता आयसीसी बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करीत राहतील.

टॅग्स :आयसीसीन्यूझीलंडजय शाहभारत
Open in App