Join us  

सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 

पावसामुळे गुजरात टायटन्सची सलग दुसरी मॅच रद्द करावी लागली. यामुळे SRH व GT यांना प्रत्येकी १ गुणावर समाधान मानावे लागले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 4:31 PM

Open in App

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये काल राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील एकही चेंडू न टाकता सनरायझर्स हैदराबाद व गुजरात टायटन्स यांच्यातला सामना रद्द झाला. पावसामुळे गुजरात टायटन्सची सलग दुसरी मॅच रद्द करावी लागली. यामुळे SRH व GT यांना प्रत्येकी १ गुणावर समाधान मानावे लागले. त्यामुळे हैदराबादने प्ले ऑफमधील स्थान पक्के झाले. या सामन्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांचे अभिनंदन केले. पॅव्हेलियनच्या दिशेने जात असताना गुजरात टायटन्सच्या केन विलियम्सनची SRH च्या मालकिण काव्या मारनसोबत भेट झाली. त्यावेळी तिने आपुलकिने केनची विचारपूस केली आणि तिच्या चाहत्यांना पहिल्यांचा तिचा आवाज ऐकू आला... 

केन विलियम्सन हा काही वर्ष हैदराबाद फ्रँचायझीकडून खेळला होता आणि जुन्या मालकिणबाईंना पाहून तोही आनंदी दिसला. 

  

हैदराबादने १३ सामन्यांत १५ गुणांसह प्ले ऑफची जागा पक्की केली.  चौथ्या जागेसाठी चेन्नई सुपर किंग्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( CSK vs RCB) यांच्यात थेट लढत रंगणार आहे. सनरायझर्स हैदराबादला क्वालिफायर १च्या दुसऱ्या स्थानावर दावा सांगायचा असेल तर त्यांना पंजाब किंग्सविरुद्ध विजय मिळवावा लागेल आणि त्याचवेळी KKR ने RR चा पराभव करावा याची वाट पाहावी लागेल. ( दोन्ही सामने रविवारी आहेत). RCB ने शेवटच्या साखळी सामन्यात १८ धावांनी किंवा १८.१ षटकांत विजय मिळवल्यास ते प्ले ऑफसाठी पात्र ठरतील ( प्रथम फलंदीज करताना २०० धावा झाल्याचे गृहित धरल्यास). CSK ने शेवटच्या साखळी सामन्यात RCB चा पराभव केला आणि RR व SRH आपापले सामने हरल्यास ऋतुराज गायकवाडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर दावा सांगेल, परंतु राजस्थान रॉयल्सने KKR ला पराभूत केल्यात ते क्वालिफायर १ मध्ये खेळतील.  

टॅग्स :आयपीएल २०२४सनरायझर्स हैदराबादकाव्या मारनकेन विल्यमसनऑफ द फिल्ड