Join us  

रिंकू द किंग...! KKRच्या युवा खेळाडूच्या स्फोटक खेळीची पॉर्न स्टार केंद्र लस्टला पडली भुरळ

kendra lust : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील १३ वा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 7:41 PM

Open in App

rinku singh ipl 2023 । अहमदाबाद : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील १३ वा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (GT vs KKR) यांच्यात खेळवला गेला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) बाजी मारली. लक्षणीय बाब म्हणजे अखेरच्या षटकात केकेआरला विजयासाठी २९ धावांची गरज होती. अशातच रिंकू सिंगने यश दयालच्या गोलंदाजीवर सलग ५ षटकार ठोकून गुजरातला पराभवाची धूळ चारली. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ४ बाद २०४ केल्या होत्या. केकेआरच्या रिंकू सिंगने केलेल्या अविश्वसनीय खेळीची देशभरातील सेलिब्रेटींना भुरळ पडली आहे. अशातच पॉर्न स्टार केंद्र लस्ट हिने देखील एक पोस्ट करून रिंकूच्या खेळीचे कौतुक केले आहे. 

दरम्यान, गुजरातकडून साई सुदर्शन (५३) आणि विजय शंकरने २४ चेंडूत नाबाद ६३ धावांची खेळी केली. गुजरातने दिलेल्या २०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची खराब सुरूवात झाली. सलामीवीर दोघेही स्वस्तात माघारी परतले. पण व्यंकटेश अय्यरने ४० चेंडूत ८० धावा करून विजयाकडे कूच केली. अशातच अल्झारी जोसेफने व्यंकटेश अय्यर (८०) आणि कर्णधार नितीश राणाला (४५) बाद करून यजमान संघाच्या चाहत्यांना जागे केले. त्यानंतर टायटन्सचा कर्णधार राशिद खानने हॅटट्रिक घेऊन जवळपास विजय निश्चित केला.

पॉर्न स्टार केंद्र लस्टने ट्विटच्या माध्यमातून रिंकूच्या खेळीचे विशेष कौतुक केले. "रिंकू द किंग", अशा शब्दांत लस्टने रिंकूच्या मॅचविनिंग खेळीला दाद दिली. 

अखेरच्या षटकात मोठा ट्विस्टअखेरच्या षटकांत केकेआरला विजयासाठी २९ धावांची गरज होती. रिंकू सिंगने स्फोटक खेळी करून सामन्याचा निकाल बदलला. यश दयालच्या गोलंदाजीवर सलग ५ षटकार ठोकून केकेआरने सलग दुसरा विजय नोंदवला. रिंकूने ६ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने २१ चेंडूत ४८ धावांची नाबाद खेळी केली. अखेर केकेआरने २० षटकांत ७ बाद २०७ धावा करून गुजरात टायटन्सचा विजयरथ रोखला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२३कोलकाता नाईट रायडर्सगुजरात टायटन्ससोशल मीडिया
Open in App