GT vs MI Live : मुंबई इंडियन्सचा लाजीरवाणा पराभव, गुजरात टायटन्सने पाजले पाणी; ५५ धावांनी जिंकला सामना

IPL 2023, Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : गुजरात टायटन्सने घरच्या मैदानावर दणदणीत विजयाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 11:18 PM2023-04-25T23:18:35+5:302023-04-25T23:20:39+5:30

whatsapp join usJoin us
GT vs MI Live Marathi : Noor Ahmed (4-0-37-3) & Rashid Khan ( 4-0-27-2),Gujarat Titans beat Mumbai Indians by 55 runs | GT vs MI Live : मुंबई इंडियन्सचा लाजीरवाणा पराभव, गुजरात टायटन्सने पाजले पाणी; ५५ धावांनी जिंकला सामना

GT vs MI Live : मुंबई इंडियन्सचा लाजीरवाणा पराभव, गुजरात टायटन्सने पाजले पाणी; ५५ धावांनी जिंकला सामना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : गुजरात टायटन्सने घरच्या मैदानावर दणदणीत विजयाची नोंद केली. गुजरातच्या २०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सला धापा लागल्या. राशीद खान व नूर अहमद या अफगाणि फिरकीपटूंनी MIला तालावर नाचवले. या दोघांनी ६४ धावांत ५ फलंदाज माघारी पाठवून GTचा विजय पक्का केला.  गुजरातने घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा लाजीरवाणा पराभव केला. 

हार्दिक पांड्याने दुसऱ्या षटकात रोहित शर्मा ( २) ला माघारी पाठवले. राशीद खानने ८व्या षटकात इशान किशन ( १३) आणि इम्पॅक्ट प्लेअर तिलक वर्मा ( २) यांना बाद केले. त्यानंतर नूर अहमदने ११व्या षटकात MIला दोन मोठे धक्के दिले. २६ चेंडूंत ३३ धावा करणाऱ्या कॅमेरून ग्रीनचा त्याने त्रिफळा उडवला अन् नंतर टीम डेव्हिड भोपळ्यावर झेलबाद केला. मुंबईला ५४ चेंडूंत १६.५५ च्या सरासरीने १४९ धावा करायच्या होत्या आणि आता सर्व मदार सूर्यकुमार यादववर होती. त्याने काही सुरेख फटकेही मारले, परंतु नूर अहमदने कॉट अँड बोल्ड करत ही विकेट मिळवली. सूर्या १२ चेंडूंत २३ धावांवर माघारी परतला. नूरने ४-०-३७-३ अशी, तर राशीदने ४-०-२७-२ अशी उत्तम गोलंदाजी केली. ( सूर्यकुमार यादवची विकेट पाहा


पियुष चावला आणि नेहल वढेरा या दोघांनी २४ चेंडूंत ४५ धावांची भागीदारी केली, परंतु ती पुरेशी नाही ठरली. २०१३मध्ये मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्सने ८७ धावांनी पराभूत केले होते आणि हा त्यांचा सर्वात मोठा पराभव ठरलेला. नशीबाने तो विक्रम आज तुटला नाही. पियुष १८ धावांवर रन आऊट झाला, तर वढेरा २१ चेंडूंत ४० धावांवर झेलबाद झाला. त्याने ३ चौकार व ३ षटकार खेचले.  अर्जून ९ चेंडूंत १३ धावांवर बाद झाला. मुंबईला ९ बाद १५२ धावा करता आल्या अन् गुजरातने ५५ धावांनी सामना जिंकला.

 

तत्पूर्वी, शुबमन गिलनंतर ( ५६) अभिनव मनोहर व डेविड मिलर यांन ७१ धावांची भागीदारी करताना गुजरातला दोनशेपार नेले. अभिनवने २१ चेंडूंत ४२ धावा, तर मिलरने २२ चेंडूंत ४६ धावा चोपल्या. राहुल तेवातियाने ५ चेंडूंत ३ षटकारांसह नाबाद २० धावा करून गुजरातला ६ बाद २०७ धावांचा टप्पा गाठून दिला. गुजरातने शेवटच्या ७ षटकांत त्यांनी २ बाद १०४ धावांचा पाऊस पाडला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: GT vs MI Live Marathi : Noor Ahmed (4-0-37-3) & Rashid Khan ( 4-0-27-2),Gujarat Titans beat Mumbai Indians by 55 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.