कॅनडा : भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगसह अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असलेल्या ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमध्ये बुधवारी मानापमानाचे नाट्य रंगले. त्यामुळे युवराजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टोरांटो नॅशनल्स आणि माँट्रीअल टायगर्स यांच्यातील सामना दोन तास उशीराने सुरू झाला. मानधन न मिळाल्यामुळे खेळाडूंनी सामना न खेळण्याचा पवित्रा घेतला होता, पण त्यांची मनधरणी केल्यानंतर अखेरीस दोन तास उशीराने या सामन्याला सुरूवात झाली.
दोन तासानंतर सुरू झालेल्या सामन्यात टोरांटो संघाने बाजी मारली.
सध्याच्या घडीला कॅनडामध्ये ग्लोबल ट्वेन्टी-२० लीग सुरु आहे. या लीगमध्ये भारताचा युवराज सिंगही खेळत आहे. या लीगमधील सामन्यात मॅच फिक्संग करण्यासाठी उमरला सांगण्यात आले होते. या दोन व्यक्तींमध्ये एकाचे नाव मंसूर खान आणि दुसऱ्याचे कृष असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांपासून सर्वच संघांनी लांब रहावे, असा इशारा भ्रष्टाचारविरोधी पथकाने दिला आहे.