भारतिय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी अखेर आपल्या घटस्फोटाची घोषणा केली आहे. या घटस्फोटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. आता या दोघांनीही 'कंबाइंड स्टेटमेंट' जारी करून याची पुष्टी दिली आहे. नताशा आणि हार्दिक यांचे २०२० मध्ये लग्न झाले होते आणि या जोडप्याला एक तीन वर्षांचा अगस्त्य नावाचा मुलगाही आहे.
या दोघांनी गेल्या वर्षी एका ग्रँड सेरेमनीमध्ये पारंपरिक पद्धतीनेही दुसऱ्यांदा लग्न केले होते. या दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही जबरदस्त व्हायरल झाला होता. यात नवरदेव हार्दिक बूट चोरीच्या विधीदरम्यान लाखो रुपये वाटताना दिसला. मात्र, आता या कपलच्या घटस्फोटानंतर हा व्हिडिओ पुन्हा एकदा जबरदस्त व्हयरल होत आहे.
हार्दिकने बूट चोरीच्या विधीदरम्यान खर्च केले होते लाखो रुपये -हार्दिकने 2020 मध्ये कोर्ट मॅरेजनंतर, सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री नताशासोबत 14 फेब्रुवारी रोजी राजस्थानातील उदयपूर येथे हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने पुन्हा लग्न केले होते. याच लग्नातील व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हयारल होत आहे.
या व्हिडिओमध्ये हार्दिकच्या भावाची पत्नी पंखुडी बूट चोरीच्या विधी दरम्यान दिसत आहे. यावेळी जेव्हा बूट परत करण्याची वेळ आली तेव्हा हार्दिक पांड्याने आपली वहिनी पंखुडीला तिची डिमांड विचारली, त्यावर पंखुडीने त्याच्याकडे 1 लाख 1 रुपयांची मागणी केली होती, मात्र हार्दिक म्हणाला होता की तो 5 लाख 1 रुपया देईल.