Join us  

शतकवीर शुबमन गिलवर BCCI ची कारवाई; गुजरात टायटन्सच्या सर्व खेळाडूंना भुर्दंड

गुजरात टायटन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्सवर ३५ धावांनी विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 4:38 PM

Open in App

गुजरात टायटन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्सवर ३५ धावांनी विजय मिळवून गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. १२ सामन्यांत १० गुण त्यांच्या खात्यात आहे आणि RCB प्रमाणे तेही इतरांच्या जीवावर प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतात. कर्णधार शुबमन गिल व साई सुदर्शन यांच्या वैयक्तिक शतकांनी हा सामना गाजला, परंतु गिलवर बीसीसीआयने कारवाई केली आहे. 

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल याला CSKविरुद्धच्या सामन्यादरम्यान स्लो ओव्हर रेट ठेवल्याबद्दल २४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा त्याच्या संघाचा सीझनमधील दुसरा ओव्हर रेटचा गुन्हा होता आणि त्यानंतर इम्पॅक्ट प्लेयरसह उर्वरित ११ खेळाडूंना प्रत्येकी ६ लाख किंवा मॅच फीची २५ टक्के रक्कम, यापैकी जी कमी असेल ती दंड म्हणून भरावी लागणार आहे. 

गिलने ५५ चेंडूंत १०४ आणि साई सुदर्शनने ५१ चेंडूंत १०३ धावा करून पहिल्या विकेटसाठी २१० धावा जोडल्या आणि संघाने ३ बाद २३१ धावा केल्या. त्यांना २६० धावापर्यंत सहज पोहोचता आले असते, परंतु चेन्नईने नंतर कमबॅक केले. मात्र, त्यांच्या फलंदाजांनी निराश केले आणि त्यांना १९६ धावाच करता आल्या.  

सामन्यानंतर गिल म्हणाला, "प्रामाणिकपणे एका टप्प्यावर आमच्या २५० धावा होतील असे वाटले होते, परंतु आम्ही कमी पडलो. शेवटच्या दोन-तीन षटकांमध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली. मला वाटले की सामन्याच्या दृष्टीनेच नव्हे तर निव्वळ धावगतीच्या दृष्टीने आम्ही १०-१५ धावा कमी केल्या."   

टॅग्स :आयपीएल २०२४शुभमन गिलगुजरात टायटन्सचेन्नई सुपर किंग्स