इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या पूर्वसंध्येला मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन प्रमुख संघांमध्ये बदल पाहायला मिळाला. गुजरात टायटन्सला मोहम्मद शमीच्या माघारीमुळे मोठा धक्का बसला होता, तर मुंबई इंडियन्सच्या दिलशान मदुशंकाला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. गुजरातने आपली कमकुवत गोलंदाजी मजबूत करण्यासाठी संदीप वॉरियर्सला शमीची रिप्लेसमेंट म्हणून संघात घेतले, तर मुंबई इंडियन्सने १९ वर्षांखालील वर्ल्ड कप गाजवणाऱ्या क्वेना माफाकाला ( Kwena Maphaka ) करारबद्ध केले.
संदीप वॉरियर ५० लाखांच्या किमतीत गुजरातच्या ताफ्यात दाखल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा १७ वर्षीय क्वेना माफाका या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत चमकला होता. जिथे त्याने सर्वाधिक २१ विकेट्स घेऊन सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकला होता. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या आक्रमणाचे नेतृत्व केले आणि संघाला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवले. या खेळाडूने यापूर्वी दक्षिण आफ्रिका अ आणि दक्षिण आफ्रिका इमर्जिंग संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.
माफाकाकडे वेग निर्माण करण्यास सक्षम आहे आणि त्याच्याकडे एक अतिशय मध्यम बाऊंसर आहे, जो फलंदाजांना घाई करण्यास भाग पाडतो. त्याने १५व्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील संघासाठी पदार्पण केले आणि दोन १९ वर्षांखालील वर्ल्ड कप खेळले आहेत. तो अजूनही हायस्कूलच्या शेवटच्या वर्षात आहे. प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू माफाकाने टेनिस आणि हॉकीमध्येही यश मिळवले आहे. तो कागिसो रबाडा ज्या सेंट स्टिथियन्स शाळेत शिकला, त्यातच शिकतोय.
IPL 2024 वेळापत्रक२२ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
२३ मार्च - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा. पासून, मोहाली
२३ मार्च - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री ८ वा. पासून, कोलकाता
२४ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स, दुपारी ३.३० वा.पासून, जयपूर
२४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
२५ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
२६ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
२७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
२८ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, रात्री ८ वा. पासून, जयपूर
२९ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
३० मार्च - लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ
३१ मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वा. पासून, अहमदाबाद
३१ मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
१ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई
२ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखौ सुपर जायंट्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
३ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
४ एप्रिल - गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,रात्री ८ वा. पासून, जयपूर
७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई
७ एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ
Web Title: Gujarat Titans (GT) named Sandeep Warrier as replacement for Mohd. Shami while Mumbai Indians (MI) added KwenaMaphaka to the squad as replacement for Dilshan Madushanka for the Indian Premier League (IPL) 2024
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.