IPL 2022 Final Gujarat Titans : RCB असो की राजस्थान... यंदाच्या फायनलमध्ये आकडेवारी गुजरातच्याच बाजूने!

गुजरातच्या संघ पहिल्याच हंगामात थेट फायनलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 01:41 PM2022-05-26T13:41:11+5:302022-05-26T13:42:16+5:30

whatsapp join usJoin us
Gujarat Titans has outside chance to win IPL 2022 Final no matter they face RCB or Rajasthan See Statistics | IPL 2022 Final Gujarat Titans : RCB असो की राजस्थान... यंदाच्या फायनलमध्ये आकडेवारी गुजरातच्याच बाजूने!

IPL 2022 Final Gujarat Titans : RCB असो की राजस्थान... यंदाच्या फायनलमध्ये आकडेवारी गुजरातच्याच बाजूने!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Final Gujarat Titans : गुजरात टायटन्सने IPL 2022 Playoffs च्या क्वालिफायर - १ मध्ये विजय मिळवला आणि राजस्थान रॉयल्सचा पराभवाची धूळ चारून थेट फायनलमध्ये धडक मारली. IPL च्या चालू गुजरातच्या संघाचा संस्मरणीय प्रवास सुरू आहे. गुजरात टायटन्सने पदार्पणाचा हंगाम खेळत अंतिम फेरी गाठली आहे. आता गुजरात टायटन्सचा सामना २९ मे (रविवार) रोजी होणार्‍या अंतिम फेरीत त्यांच्या घरच्या मैदानावर अहमदाबाद येथे होणार आहे. दुसरा क्वालिफायर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार असून या सामन्यातील विजेत्याशी गुजरात विजेतेपदासाठी भिडणार आहे. या दरम्यान, IPL च्या जुन्या आकडेवारीवर नजर टाकल्यास गुजरात टायटन्सने विजेतेपद मिळवण्याची शक्यता खूपच जास्त आहे.

IPL च्या इतिहासात केवळ तीन वेळा असा प्रसंग घडला, जेव्हा क्वालिफायर १ चा विजेता संघ चॅम्पियन बनला नाही. IPL 2013 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज, IPL 2016 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि IPL 2017 च्या मोसमात रायझिंग पुणे सुपर जायंट्स क्वालिफायर 1 मध्ये जिंकूनही अंतिम फेरीत हरले होते. उर्वरित आठ वेळा मात्र क्वालिफायर १ मधील केवळ विजेता संघ चॅम्पियन बनला होता.

IPL 2011 मध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये प्ले ऑफचे पद्धतीने सामने खेळवले गेले. यापूर्वी, 2008 ते 2010 च्या IPL हंगामात प्रत्येकी दोन उपांत्य फेरी आणि एक अंतिम सामना खेळण्याची तरतूद होती. पण Playoffs फेरी सुरू झाल्यापासून क्वालिफायर १, एलिमिनेटर, क्वालिफायर २ आणि फायनल असे सामने खेळवले जाऊ लागले. त्यानुसार, गुणतालिकेतील अव्वल २ संघ क्वालिफायर १ मध्ये खेळतात. विजेता संघ थेट अंतिम फेरीत जातो. आणि पराभूत संघाला क्वालिफायर २ मध्ये एलिमिनेटरमध्ये जिंकलेल्या संघाशी स्पर्धा करावी लागते.

 

Web Title: Gujarat Titans has outside chance to win IPL 2022 Final no matter they face RCB or Rajasthan See Statistics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.