IPL 2022, Gujarat Titans jersey launch : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीच्या जर्सीचे रविवारी अनावरण करण्यात आले. हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स या नावाने ही फ्रँचायझी मैदानावर उतरणार आहे. जर्सी लाँच करताना गुजरातच्या पारंपरिक नृत्यही झाले.
इंग्लंडच्या जेसन रॉयने स्पर्धेआधीच माघार घेतल्यामुळे गुजरातचे टेंशन वाढले होते. पण, त्यांनी अफगाणिस्तानच्या रहमनुल्लाह गुरबाज ( Rahmanullah Gurbaz) याला करारबद्ध केले. २०१७मध्ये मिस ऐनक नाइट्स संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या गुरबाजने विविध ट्वेंटी-२० लीगमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. तो खुल्ना टायटन्स, बार्बाडोस ट्रायडंट्, मुलतान सुलतान, इस्लामाबाद युनायटेड आणि जाफना किंग्स आदी संघांकडून खेळला आहे. २० वर्षीय खेळाडूने अफगाणिस्तानसाठी १८ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांत ५३१ धावा केल्या आहेत. गुरबाज हा गुजरात टायटन्सकडून खेळणार तिसरा अफगाणिस्तानी खेळाडू आहे. गुजरातने आधीच राशिद खान व नूर अहमद यांना करारबद्ध केले आहे.
CVC Capital यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे. CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत. CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक पांड्या (१५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना मेगा ऑक्शनआधी करारबद्ध केले आहे.
गुजरात टायटन्स: शुभमन गील, हार्दिक पांड्या, राशिद खान, , मोहम्मद शमी ( ६.२५ कोटी), लॉकी फर्ग्युसन ( १० कोटी), अभिनव सदारंगानी ( २.६० कोटी), राहुल तेवतिया ( ९ कोटी), नूर अहमद ( ३० लाख), साई किशोर ( ३ कोटी), डॉमनिक ड्रेक्स ( १.१० कोटी), विजय शंकर ( १.४० कोटी), जयंत यादव ( १.७० कोटी), दर्शन नलकांडे ( २० लाख), यश दयाल ( ३.२० कोटी), डेव्हिड मिलर ( ३ कोटी), वृद्धीमान सहा ( १.९० कोटी), मॅथ्यू वेड ( २.४० कोटी), अल्झारी जोसेफ ( २.४० कोटी), प्रदीप सांगवान ( २० लाख) , वरुण अॅरोन ( ५० लाख), बी साई सुदर्शन ( २० लाख)
See full Time Table of Gujarat Titans
- २८ मार्च - गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- २ एप्रिल - गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- ८ एप्रिल - पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- ११ एप्रिल - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- १४ एप्रिल - राजस्थान रॉयल्स विरुद्घ गुजरात टायटन्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- १७ एप्रिल - गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- २३ एप्रिल - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स, डी वाय पाटील स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
- २७ एप्रिल - गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- ३० एप्रिल - गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, ब्रेबॉर्न स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
- ३ मे - गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स, डी वाय स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- ६ मे - गुजरात टायट्सन विरुद्ध मुंबई इंडियन्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- १० मे - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- १५ मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, वानखेडे स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
- १९ मे - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून