Join us  

IPL 2023 : मराठमोळ्या ऋतुराजचा षटकार रोखणारा केन विल्यमसन OUT; IPL मधून झाला बाहेर!

 kane williamson injury, gujarat titans : इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या हंगामातील पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पार पडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2023 11:58 AM

Open in App

kane williamson injury update ipl 2023 । मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या हंगामातील पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पार पडला. गतविजेत्या टायटन्सने चेन्नईला पराभवाची धूळ चारून विजयी सलामी दिली. मात्र, गुजरातचा स्टार खेळाडू केन विल्यमसनच्या दुखापतीमुळे संघाला मोठा धक्का बसला आहे. मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाडचे वादळ रोखण्याच्या प्रयत्नात विल्यमसनला दुखापत झाली अन् तो आता संपूर्ण आयपीएलला मुकणार आहे. 

गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे न्यूझीलंडचा दिग्गज विल्यमसन संपूर्ण आयपीएलमधून बाहेर झाला आहे. गुजरात टायटन्सच्या फ्रँचायझीने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. फ्रँचायझीने ट्विट करत म्हटले, "आम्हाला ही घोषणा करताना खेद वाटतो की, केन विल्यमसनला चेन्नई सुपर किंग्जविरूद्धच्या सामन्यात दुखापत झाल्यामुळे तो आयपीएल २०२३ मधून बाहेर झाला आहे. आम्हाला आशा आहे की तो लवकर बरा होईल." 

खरं तर यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना चेन्नईविरूद्धच्या सामन्यातील १३व्या षटकांत विल्यमसनला दुखापत झाली. ऋतुराज गायकवाडने मारलेला षटकार रोखण्याच्या प्रयत्नात असलेल्या विल्यमसनच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाल्याने खेळ काही वेळ थांबवण्यात आला होता. विल्यमसनने शानदार क्षेत्ररक्षण करून षटकार रोखला याशिवाय झेल देखील पकडला मात्र सीमारेषेच्या बाहेर जाण्याआधी त्याने चेंडू आत मैदानात फेकला. सामना झाल्यानंतर विल्यमसनला स्कॅनसाठी नेण्यात आले, त्यानंतर समोर आले की त्याला ठीक होण्यासाठी आणखी काही वेळ लागेल. विल्यमसनच्या जागी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून साई सुदर्शनने फलंदाजी केली होती. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

 

टॅग्स :आयपीएल २०२३गुजरात टायटन्सकेन विल्यमसनचेन्नई सुपर किंग्सऋतुराज गायकवाड
Open in App