गुजरात टायटन्स आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज मॅथ्यू वेड ( Matthew Wade) याने शेफिल्ड शील्ड फायनलपूर्वी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मॅथ्यू वेड हा तस्मानिया संघाकडून शेफिल्ड शील्ड फायनलमध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुढील आठवड्यात पर्थ येथे शेवटचा सामना खेळणार आहे.
२००७ मध्ये वेडने प्रथम श्रेणी क्रिकेटला सुरुवात झाली आणि १६५ सामन्यांत त्याने ४०.८१च्या सरासरीने ९१८३ धावा केल्या आहेत. त्यात १९ शतकं व ५४ अर्धशतकं झळकावली आहेत. यष्टिंमागे त्याने ४४२ झेल पकडले आहेत व २१ स्टम्पिंग केल्या आहेत. या कारकीर्दित त्याने दहा वर्ष व्हिक्टोरीया संघाचे प्रतिनिधित्व केले आणि शेफील्ड शील्डचे चार जेतेपदं जिंकली, त्यापपैकी दोन जेतेपदं ही त्याच्या नेतृत्वाखाली आली. २०१७-१८ मध्ये तो घरचा संघ तस्मानियाकडे परतला.
३६ वर्षीय वेडने ऑस्ट्रेलियाकडून ३६ कसोटी सामन्यांत १६१३ धावा केल्या आहेत. त्यात चार शतकं आहेत आणि त्यामधेय २०१९च्या अॅशेस मालिकेत झळकावलेल्या २ मॅच विनिंग शतकांचा समावेश आहे. दरम्यान, गुजरात टायटन्सच्या आयपीएल २०२४ च्या मोसमातील सलामीच्या सामन्यात वेड खेळणार नाही. "त्याचे आयपीएल फ्रँचायझीशी बोलणे झाले आहे आणि त्याला शेफील्ड शील्ड फायनलमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे तो कदाचित पहिला सामना खेळणार नाही," असे तस्मानियाचे मुख्य प्रशिक्षक जेफ वॉन यांनी यापूर्वी सांगितले होते.
दरम्यान, मॅथ्यू वेडच्या घरी नवा पाहुण्याचे आगमन झाले आहेत.