Join us  

Nathan Lyon Video: ढुंढो ढुंढो रे... Live मॅचमध्ये चेंडू झुडुपात गेला, ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन जंगलात उतरला अन्...

Nathan Lyon Ball searching Video: शॉट इतका जोरात लगावला होता की चेंडू सीमारेषेच्या पार थेट झाडाझुडुपांमध्ये गेला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 3:06 PM

Open in App

Nathan Lyon Ball searching Video: लहानपणी आपण क्रिकेट खेळत असताना बरेचदा चेंडू झाडाझुडुपात जायचा. चेंडू परत येईपर्यंत खेळ पुढे जाऊ शकत नसायचा. त्यामुळे सगळी मित्रमंडळी तो चेंडू शोधायला झाडाझुडुपांमध्ये आणि काटाकुट्यांमध्ये उतरत असत. चेंडू शोधून मगच सगळे बाहेर येत. अनेक ठिकाणी ज्याने चेंडू घालवला असेल तो आणि त्याचे सहकारी मित्र चेंडू शोधायच्या कामगिरीवर असायचे. पण एका मोठ्या स्पर्धेत Live मॅच सुरु असताना एखाद्या आंतरराष्ट्रीय स्तराच्या खेळाडूवर अशी वेळी आली असेल तर.... तुम्हाला जरी ही गोष्ट काल्पनिक वाटत असली तरीही असं खरंच ऑस्ट्रेलियामध्ये घडलं आहे. आणि तो खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियन दिग्गज फिरकीपटू नॅथन लायन आहे.

जोरदार षटकार अन् चेंडू झुडुपांमध्ये...

आगामी भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेआधी ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन ऑस्ट्रेलियातील शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत खेळत आहे. साऊथ ऑस्ट्रेलिया आणि न्यू साऊथ वेल्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळात हा प्रकार घडला. साऊथ ऑस्ट्रेलिया संघाचा फलंदाज तनवीर संघा याने लेगच्या दिशेला षटकार लगावला. शॉट इतका जोरात लगावला होता की चेंडू सीमारेषेच्या पार थेट झाडाझुडुपांमध्ये गेला.

चेंडू शोधायला गेला अन् वेगळाच चेंडू सापडला

मग काय... नॅथन लायन चक्क त्या झाडाझुडुपात उतरला आणि चेंडू शोधू लागला. त्याने चेंडू शोधला पण हरवलेल्या चेंडूचा रंग लाल होता आणि त्याला पांढऱ्या रंगाचा चेंडू सापडला. अखेर नॅथन लायनच्या मदतीला ग्राऊंडवरील स्टाफ आणि काही सहकारीही गेले. अखेर थोड्या वेळाने चेंडू सापडला.

दरम्यान, या सामन्याची स्थिती पाहता सामन्याचा निकाल लागणार नाही. परंतु आगामी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ही स्पर्धा अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी रंगती तालीम आहे.

टॅग्स :ऑफ द फिल्डआॅस्ट्रेलियासोशल व्हायरलसोशल मीडिया