कराची : पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक फलंदाज जुल्करनैन हैदरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१० च्या वन-डे मालिकेदरम्यान अचानक गायब होण्यासाठी उमर अकमलला दोषी ठरविले. सामना गमाविण्यासाठी तयार नसल्यामुळे या वादग्रस्त खेळाडूने धमकी दिली होती, असे जुल्करनैनने म्हटले आहे.
जुल्करनैनने दावा केला की, त्याला दुबईमध्ये संघाचे हॉटेल सोडून रहस्यमय परिस्थितीमध्ये लंडनला जाण्यासाठी बाध्य व्हावे लागले. कारण त्यावेळी त्याला त्याचा सहकारी उमर व काही अन्य लोकांकडून मालिकेतील तिसऱ्या वन-डे सामन्यात खराब कामगिरी करण्यासाठी नकार दिल्यामुळे धमकी देणारे संदेश मिळत होते. जुल्करनैन म्हणाले,‘मला आठवते की मी त्याला म्हटले की त्याने आपले काम करावे आणि ड्रिंक्स घेऊन जाण्याची भूमिका बजावावी. पण त्यानंतर त्याने (उमर) व काही अन्य खेळाडूंनी मला थेट धमकी देण्यास सुरुवात केली. त्यांनी मला एवढे टॉर्चर केले की माझ्यावर मानसिक दडपण आले. मला भीती वाटायला लागली आणि मी कुणाला न सांगता लंडनला गेलो.’ जुल्करनैन ३४ वर्षांचा आहे. त्याने दुबईमध्ये संघ व्यवस्थापनाला न सांगता हॉटेल सोडल्यानंतर लंडनमध्ये आसरा मिळवला होता. त्याने केवळ एक कसोटी सामना खेळला आणि ८८ धावा केल्या. या यष्टिरक्षक फलंदाजाने दावा केला की, उमरने त्याला खराब कामगिरी करण्यास सांगितल्याची माहिती संघव्यवस्थापनाला दिली होती.
त्याची संपत्ती जप्त करायला हवी
नोव्हेंबर २०१० मध्ये घडलेल्या या घटनेनंतर जुल्करनैनची कारकीर्द संपुष्टात आली. तो म्हणाला,‘स्पॉट फिक्सिंगसाठी संपर्क केल्याचा खुलासा न केल्यामुळे उमरवर लावण्यात आलेली तीन वर्षांची बंदी फार कमी आहे. साशंक घटनांमध्ये त्याचा समावेश राहिलेला आहे. त्यामुळे त्याच्यावर आजीवन बंदीची कारवाई व्हायला हवी आणि त्याची संपत्तीही जप्त करायला हवी.’
Web Title: Had fled because of Umar's threat: Zulkarnaen
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.