Join us  

पाकिस्तानी खेळाडूचा प्रताप; वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान पत्नीला लपवलं होतं कपाटात

पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या फतव्यानं झाली गोची

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 1:37 PM

Open in App

वर्ल्ड कपमध्ये पत्नीसोबत राहावं यासाठी क्रिकेटपटूही काय करतील याचा नेम नाही. पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज साकलेन मुश्ताक याने १९९९ च्या वर्ल्डकपमध्ये पत्नीला चक्क कपाटात लपवले होते. खुद्द साकलेन मुश्ताकनेच या गंमतीशीर आठवणी क्रिकेटप्रेमींसोबत शेअर केल्या आहेत. 

माजी क्रिकेटपटू साकलेन मुश्ताकने १९९९ च्या वर्ल्डकपच्या आठवणींना उजाळा दिला. १९९९ च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आम्हाला पत्नीला सोबत नेण्याची परवानगी दिली होती. दौरा चांगला जात होता आणि वेळ मिळाल्यावर आम्ही सहकुटुंब भटकंतीही करायचो. मात्र सेमीफायनलपूर्वी बोर्डाने आम्हाला पत्नींना सोबत ठेवता येणार नाही असा आदेश काढला. बोर्डाच्या या निर्णयानंतर मी रुमवर आलो. पत्नी सानाला सांगितले तू परत जाणार नाही, या दौ-यात मला तुझी साथ हवी आहे असे तिला सांगितल्याचे साकलेन सांगतो. 

आम्ही ज्या हॉटेलवर जायचो तिथे माझ्यापूर्वी माझी पत्नी चेक इन करायची. मी आल्यावर ती माझ्या रुममध्ये येऊन राहायची.  संघ मॅनेजर किंवा अन्य खेळाडू आले की तिला कपाटात लपवून द्यायचो असे साकलेनने स्पष्ट केले. अझहर महमूद आणि मोहम्मद युसूफला या प्रकाराची माहिती होते असे त्याने म्हटले आहे. हा किस्सा सांगताना साकलेन म्हणतो, एकदा अझहर महमूद  आणि मोहम्मद युसूफ माझ्या खोलीत आले व जोरजोरात मा र हसू लागले. मी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे बघू लागलो. शेवटी माझी पत्नी माझ्यासोबतच राहते हे माहित असल्याचे त्यांनी सांगितले व आता आम्ही आल्यावर तिला कपाटात लपवू नकोस असे सांगून दोघेही माघारी परतले.  

मुश्ताकनं 49 कसोटी आणि 169 वन डे सामन्यांत अनुक्रमे 208 व 288 विकेट्स घेतल्या.

बाबो: 89 वर्षांचे वडील अन् 65 वर्षांची बहीण; फॉर्म्युला वनच्या माजी बॉसला पुत्ररत्न!

 

सुशांत सिंग राजपूतचा मित्र अन् दिग्गज बॉक्सरवर कोसळला दुःखाचा डोंगर!

Fact check: चीनला विरोध करणाऱ्या हाँगकाँगच्या आंदोलकांमध्ये खरंच दिसले का किम जोंग-उन?

ENGvsWI : इंग्लंड संघावर कोरोना संकट? खेळाडूची प्रकृती अचानक बिघडली, झाला सेल्फ आयसोलेट 

इरफान पठाणला 'पुढील हाफिज सईद' म्हणणाऱ्या पोस्टवर बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा म्हणते...

 

टॅग्स :आयसीसीपाकिस्तान