RCB, Virat Kohli । नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज वसिम अक्रम नेहमी त्याच्या विधानांमुळे चर्चेत असतो. आता त्याने आयपीएलमध्ये काल झालेल्या सामन्यावर बोलताना एक अजब विधान केले आहे. काल दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना पार पडला. लक्षणीय बाब म्हणजे विराट कोहलीच्या संघाला त्याच्या घरच्या मैदानावर पराभव पत्करावा लागला. खरं तर आरसीबीच्या संघाला अद्याप एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता आले नाही.
दरम्यान, आरसीबीच्या संघाने तीनवेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पण ट्रॉफीच्या एक पाऊल दूर असताना संघाला हार मानावी लागली आहे. २०११ मध्ये बंगळुरूला ५८ धावांनी पराभूत चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने सलग दुसऱ्यांदा किताब पटकावला होता. दुसरीकडे, आरसीबीने आयपीएलच्या चालू हंगामात एकूण १० सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी पाच सामने जिंकले आहेत आणि तेवढ्याच सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. संघ सध्या १० गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर स्थित आहे.
वसिम अक्रमचं अजब विधान
आरसीबीच्या संघाबद्दल बोलताना पाकिस्तानी दिग्गज अक्रमने एक विधान केले आहे. "जर महेंद्रसिंग धोनी आरसीबीचा कर्णधार असता तर त्याने आतापर्यंत तीनदा विजेतेपद पटकावले असते", असे अक्रमने म्हटले आहे. तो स्पोर्ट्सकीडाशी बोलत होता. तसेच एवढा पाठिंबा मिळूनही आरसीबीला एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यांच्याकडे जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम क्रिकेटपटू विराट कोहली आहे, परंतु दुर्दैवाने त्यांना अद्याप ट्रॉफी जिंकता आलेली नाही. धोनी आरसीबीमध्ये असता तर त्यांना ट्रॉफी जिंकून देण्यात मदत झाली असती, असे अक्रमने अधिक सांगितले.
धोनीचे केले कौतुक
धोनीला संघाचे नेतृत्व करण्याची सवय आहे. कोहलीला देखील ही सवय लागली असेल, पण धोनीला खूपच सवय झाली आहे. तो आतून अजिबात शांत नाही, पण तो दाखवून देतो की तो शांत आहे. तो खेळाडूंच्या खांद्यावर हात ठेवतो ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. धोनी हा असा आहे की ज्याला आपल्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करायचा हे माहित आहे, असे वसिम अक्रमने अधिक म्हटले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Had MS Dhoni been the captain of Royal Challengers Bangalore in the IPL, they would have won the 3 trophy, says former Pakistan player Wasim Akram
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.