Jhulan Goswami on WPL । नवी दिल्ली : मुंबईत महिला प्रीमिअर लीगचा (WPL 2023) पहिला हंगाम पार पडला. डब्ल्यूपीएलच्या स्पर्धेमुळे महिला क्रिकेटला उभारी मिळाली असल्याचे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे. तसेच भारतासह विदेशातील महिला खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून आपली प्रतिभा जगाला दाखवण्याचे एक मोठे व्यासपीठ मिळाले. अशातच भारतीय महिला संघाची माजी दिग्गज झुलन गोस्वामीने एक मोठा दावा केला आहे. जर 4-5 वर्षांपूर्वी महिला प्रीमिअर लीग (Women's Premier League) सुरू झाली असती तर भारतीय संघाने आतापर्यंत कमीत कमी एक विश्वचषक जिंकला असता, असे तिने म्हटले आहे.
दरम्यान, झुलन गोस्वामीच्या विधानाला संघातील खेळाडू हरलीन देओल आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी देखील दुजारा दिला. या तिन्ही स्टार खेळाडूंनी महिला प्रीमिअर लीगच्या यशाबद्दल विविध मुद्द्यांवर भाष्य केले. 26 मार्च रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला गेला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून जेतेपद पटकावले.
झुलन गोस्वामीचा मोठा दावा
बिझनेस टूडेला दिलेल्या मुलाखतीत झुलन गोस्वामीने म्हटले, जर चार-पाच वर्षांपूर्वी महिला प्रीमिअर लीग सुरू झाली असती तर कदाचित ती यामध्ये खेळत असते. मात्र, तसे झाले नाही. आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर ती प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. तसेच ही स्पर्धा 4-5 वर्षांपूर्वी झाली असती तर भारतीय संघ कमीत कमी एकदा तरी विश्वविजेता बनला असता असा दावा झुलनने केला आहे.
ऑस्ट्रेलियन खेळाडूंची रणनिती समजली
खरं तर भारतीय महिला संघाने वरिष्ठ पातळीवर अद्याप एकही आयसीसीचा किताब जिंकलेला नाही. मात्र, 2017 पासून टीम इंडिया दोन विश्वचषक फायनल, राष्ट्रकुल स्पर्धा फायनल आणि एका विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभूत झाली आहे. या मुलीखतीदरम्यान हरलीन देओल आणि जेमिमाने सांगितले की, महिला प्रीमिअर लीगच्या आगमनामुळे त्यांना विदेशातील खेळाडूंची रणनिती समजण्यास मदत झाली आहे. जेमिमाने म्हटले की, तिला आधी ऑस्ट्रेलियन खेळाडू गर्विष्ठ वाटायचे. पण डब्ल्यूपीएलमध्ये त्यांच्यासोबत खेळल्यानंतर लक्षात आले की, कांगारूचे खेळाडू केवळ मैदानात गंभीर असतात.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Had the Women's Premier League started 4-5 years ago, the Indian team would have won the World Cup, claims former legend Jhulan Goswami
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.