दुबई : पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहंमद हफीज याची गोलंदाजीशैली एका स्वतंत्र तपासात बेकायदेशीर आढळली आहे. त्यामुळे या आॅफस्पिनरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता गोलंदाजी करता येणार नाही. त्याला आयसीसीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोलंदाजीसाठी निलंबित केले आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनुसार हफीजच्या गोलंदाजीशैलीचे आकलन केल्यानंतर बरेचदा चेंडू टाकताना त्याच्या हाताचा कोपरा हा १५ डिग्रीच्या मानकापेक्षा जास्त वळतो. तथापि, हफीजला पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या मान्यताप्राप्त देशांतर्गत स्पर्धेत गोलंदाजी करण्याची सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे तो पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल)मध्ये गोलंदाजी करू शकतो.आयसीसीच्या बेकायदेशीर गोलंदाजी नियमावलीच्या ११.१ नियमानुसार हफीजला आंतरराष्ट्रीय निलंबन सर्वच राष्ट्रीय क्रिकेट महासंघांतर्गत होणाºया देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत लागू करावे लागणार आहे. तथापि, नियम ११.५ नुसार आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या सहमतीनंतर हफीज पीसीबीअंतर्गत होणाºया देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत गोलंदाजी करू शकतो.हफीजच्या गोलंदाजीशैलीविषयी श्रीलंकेविरुद्ध १८ आॅक्टोबर रोजी अबुधाबी येथे झालेल्या तिसºया दिवसादरम्यान रिपोर्ट करण्यात आला होता. त्याची शैली १ नोव्हेंबरला लोगबोरोग युनिव्हर्सिटी येथे तपासण्यात आली होती. तो त्याच्या गोलंदाजीशैलीत सुधारणा केल्यानंतर पुन्हा तपासण्यासाठी अर्ज करू शकतो.