Join us  

निम्म्या संघाला इंग्रजीच येत नाही! वीरेंद्र सेहवागने सांगितले RCB च्या पराभवामागचं नेमकं कारण

IPL 2024 - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आयपीएल २०२४ मध्ये सोमवारी सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 5:44 PM

Open in App

IPL 2024 - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आयपीएल २०२४ मध्ये सोमवारी सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला.  SRH च्या ३ बाद २८७ धावांचा ( आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम) पाठलाग करताना RCB ने ७ बाद २६२ धावांपर्यंत ( ट्वेंटी-२० क्रिकेटमधील लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वोत्तम धावा) मजल मारली. पण, या पराभवानंतर RCB ची गाडी गुणतालिकेत पुन्हा तळाच्या क्रमांकावर घसरली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ७ मध्ये १ विजय मिळवला आहे आणि त्यांना प्ले ऑफसाठी उरलेले सर्वच्या सर्व ७ सामने जिंकावे लागणार आहेत. पराभवानंतर वीरेंद्र सेहवागने ( Virender Sehwag) ने RCB च्या अपयशाचं नेमकं कारण सांगितलं. 

सेहवाग म्हणाला, ''जर तुमच्याकडे १२ ते १५ भारतीय खेळाडू असतील, फक्त १० परदेशी खेळाडू असतील आणि तुमचा संपूर्ण स्टाफ परदेशी खेळाडूंनी बनलेला असेल, तर ही समस्या आहे. त्यातील काही मोजकेच आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत, बाकीचे सर्व भारतीय आहेत आणि त्यातील निम्म्या लोकांना इंग्रजीही कळत नाही. तुम्ही त्यांना कसे प्रोत्साहित कराल? त्यांच्यासोबत कोण वेळ घालवतो? त्यांच्याशी कोण बोलतो? मला एकही भारतीय कर्मचारी दिसत नाही. खेळाडूंवर विश्वास ठेवता येईल असे कोणीतरी सपोर्ट स्टाफमध्ये असावे.''

८३ धावा, ३५ चेंडू, ७ सिक्स! Dinesh Karthik ने खेचला IPL 2024 मधील उत्तुंग षटकार, Video 

''खेळाडूंना कम्फर्ट लेव्हल हवी आहे जी त्यांना सध्या मिळत नाही. कर्णधार फॅफ डू प्लेसिससमोर खेळाडू काहीही बोलू शकत नाहीत, कारण त्याने काही विचारले तर त्यांना उत्तर द्यावे लागेल. जर कर्णधार भारतीय असेल तर तुमच्या मनात काय चालले आहे, ते तुम्ही शेअर करू शकता. पण जर तुम्ही परदेशी खेळाडूसोबत असे केले तर तुम्ही पुढील सामन्यात प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडू शकता. आरसीबीला किमान २-३ भारतीय सपोर्ट स्टाफची गरज आहे,''असेही वीरू म्हणाला.

 

टॅग्स :आयपीएल २०२४रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरेंद्र सेहवाग