Join us  

हमारी भी रिस्पेक्ट है! वर्ल्ड कप खेळायला भारतात जाणार नाही; पाकिस्तानी खेळाडूची BCCI ला धमकी

या वर्षी होणार्‍या आशिया कप २०२३ चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टीम इंडियाला या स्पर्धेसाठी पाकिस्तानला न पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर वातावरण तापले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 1:23 PM

Open in App

या वर्षी होणार्‍या आशिया कप २०२३ चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टीम इंडियाला या स्पर्धेसाठी पाकिस्तानला न पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर वातावरण तापले आहे. भारताच्या पवित्र्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात ( PCB) खळबळ उडाली आहे. पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा आणि विद्यमान अध्यक्ष नजम सेठी यांनीही भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार घालण्याची धमकी दिली आहे. पीसीबीचे म्हणणे आहे की जर टीम इंडिया आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये आली नाही, तर पाकिस्तानचा संघ या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कप २०२३ मध्ये देखील सहभागी होणार नाही. आता बीसीसीआयला धमकी देणाऱ्यांच्या यादीत कामरान अकमलचेही ( Kamran Akmal) नाव समाविष्ट झाले आहे.

भारताला ICC ट्रॉफी जिंकून दिली नाही, तरीही विराटला स्वतःचा अभिमान; म्हणाला, लोकं मला अयशस्वी समजतात

पाकिस्तानचीही रिस्पेक्ट आहे, असे माजी यष्टिरक्षक फलंदाज कामरानने म्हटले आहे. जर ते आशिया कप स्पर्धेसाठी येणार नसतील तर आम्हीही भारतात जाऊ नये. पाकिस्तान संघाच्या निवड समितीचे सदस्य कामरानने नादिर अलीच्या पॉडकास्टमध्ये म्हटले आहे की, "जर भारत आशिया चषक स्पर्धेत यायला तयार नसेल, तर आम्ही २०२३चा वन डे वर्ल्ड कप खेळण्यासाठी तिथे जाऊ नये. आमचाही आदर आहे. आम्ही जगज्जेतेही झालो आहोत. चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे आणि सर्व फॉरमॅटमध्येही अव्वल आहोत.''

आशिया चषक स्पर्धेच्या ठिकाणाबाबत या महिन्याच्या सुरुवातीला बहरीनमध्ये झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या  बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की पाकिस्तान दौऱ्यासाठी सरकारकडून मान्यता मिळणार नाही. त्याचवेळी पीसीबीचे म्हणणे आहे की त्यांनी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडसह अनेक देशांचे यशस्वी दौरे आयोजित केले आहेत, त्यामुळे टीम इंडियानेही पाकिस्तानात यावे.

आशिया चषक स्पर्धेसाठी विचारात घेतलेल्या नवीन फॉर्म्युल्यानुसार भारतीय संघ आपले सामने यूएईमध्ये खेळेल, तर उर्वरित देश पाकिस्तानला जाऊ शकतात. त्याचबरोबर भारत-पाकिस्तान सामना यूएईमध्ये ठेवण्याचा प्रस्ताव आहे. जर दोन्ही देश उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत पोहोचले तर हे सामने यूएईमध्येही होऊ शकतात.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानएशिया कप 2022पाकिस्तान
Open in App