इंदूर : भारतीय संघाचा पुढील कसोटी कर्णधार म्हणून विराटच्या जागी लोकेश राहुल याच्याकडे पदभार सोपवायला हवा, अशी सूचना बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळे यांनी सोमवारी केली. २९ वर्षांचा हा यष्टिरक्षक-फलंदाज दीर्घकाळ नेतृत्व सांभाळण्यास सक्षम वाटतो, असेही जगदाळे यांनी म्हटले आहे.
कोहलीने शनिवारी कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा तडकाफडकी निर्णय घेत सर्वांना आश्चर्यचकित केले होते. या पार्श्वभूमीवर जगदाळे म्हणाले,‘ माझ्या मते दीर्घकाळ जबाबदारी सांभाळणारा कर्णधार भारतीय संघाला मिळायला हवा. यासाठी मी देशाचा पुढील कर्णधार या नात्याने राहुलचे नाव सूचवेन.’
‘राहुलने तीनही प्रकारात चांगली कामगिरी केली आहे. भारतासोबतच विदेशातदेखील त्याने धावा काढल्या आहेत. बीसीसीआय आणि निवडकर्त्यांनी अब्जावधीची उलाढाल असलेल्या टी-२० शी संबंधित शक्तिस्थळांनी भारताच्या राष्ट्रीय क्रिकेटधोरणात कुठलाही हस्तक्षेप करू नये, याची काळजी घ्यावी,’असेही माजी राष्ट्रीय निवड समिती प्रमुख जगदाळे यांनी सांगितले. मला कोहलीचा अचानक नेतृत्व सोडण्याचा निर्णय खटकला. कसोटीत तो भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे.
Web Title: Hand over the leadership of the Test team to Lokesh Rahul says Jagdale
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.