लंडन : किंग्जस्टन ओव्हलवर सुरू असलेल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने रवींद्र जडेजा याच्या ८६ धावांच्या झुंजार खेळीच्या जोरावर सर्वबाद २९२ धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात फक्त ४० धावांची आघाडी मिळाली. तर दुसऱ्या डावात इंग्लंडने चहापानापर्यंत बिनाबाद २० धावा केल्या होत्या. कसोटी पदार्पण करत असलेल्या हनुमा विहारीनेही शानदार खेळी करताना १२४ चेंडूत ५६ धावा केल्या.
रविवारी युवा हनुमा विहारी याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने १२४ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने ५६ धावा केल्या. पर्दापण करणाºया विहारी याला मोेईन अली याने बाद केले. त्यानंतर जडेजा याने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. जडेजा याने अखेरच्या तीन गड्यांसोबत एकूण ५५ धावांची भागीदारी केली. त्याने इशांत शर्मासोबत १२ धावांची तर मोहम्मद शमीसोबत ११ धावांची भागीदारी केली. त्यानंतर इंग्लंडचे गोलंदाज लवकर डाव संपवतील असे वाटत होते. मात्र जडेजा याने चतुर फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांना वाट बघायला लावली. त्याने जसप्रीत बुमराहसोबत ३० धावांची भागीदारी केली. त्यात बुमराह याने एकही धाव घेतली नाही. सर्व ३० धावा जडेजाने काढल्या. अखेरीस मोईन अलीच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर धाव घेताना जडेजा बाद झाला आणि भारताचा डाव संपला. इंग्लंडकडून अँडरसन, स्टोक्स आणि मोईन अली यांनी प्रत्येकी २, तर सॅम कुरन, अदिल राशिद, स्टुअर्ट ब्रॉड यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
दुसºया डावात इंग्लंडची सुरुवात सावध झाली. अखेरचा कसोटी सामना खेळत असलेल्या अॅलिस्टर कूकने किटॉन जेनिंग्जसह कोणत्याही प्रकारची घाई न करता खेळपट्टीवर जम बसवण्यास प्राधान्य दिले. त्यांनी चहापानापर्यंत बिनबाद २० धावा अशी मजल मारत इंग्लंडला एकूण ६० धावांची आघाडी मिळवून दिली. चहापानासाठी खेळ थांबला तेव्हा कूक १३ आणि जेनिंग्ज ७ धावांवर खेळत होते. (वृत्तसंस्था)
>धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : १२२ षटकात सर्वबाद ३३२ धावा.
भारत (पहिला डाव) : ९५ षटकांत सर्वबाद २९२ धावा (रवींद्र जडेजा नाबाद ८६, हनुमा विहारी ५६, विराट कोहली ४९; मोइन अली २/५०, जेम्स अँडरसन २/५४, बेन स्टोक्स २/५६.)
इंग्लंड (दुसरा डाव) : १७ षटकांत बिनबाद २० धावा (अॅलिस्टर कूक खेळत आहे १३, किटॉन जेनिंग्ज खेळत आहे ७.)
Web Title: Hanuma Vihari, Ravindra Jadeja's half-century
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.